Yuzvendra Chahal : टीम इंडियाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा हे सध्या चर्चेत आहेत. या दोघांमध्ये नेमकं काय सुरु आहे? असा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. यातच आता या प्रकरणात नवीन ट्विस्ट निर्माण झाला आहे.
काही दिवसांपूर्वी युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिचे चहल हे आडनाव काढून टाकले होते. सुरुवातीला धनश्री वर्मा चहल असे असलेले नाव आता तिने धनश्री वर्मा असे केले आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
त्यानंतर, युझवेंद्र चहलने त्याच्या एका इन्स्टा स्टोरीमध्ये एक नवीन आयुष्य सुरू होणार आहे, असं म्हटलं होतं. त्यामुळे चाहते आणखी गोंधळून गेले आहे. त्यामुळे या दोघांमध्ये काही वाद झाला आहे का?, असे सर्वांना वाटत आहे.
या सगळ्या प्रकरणामध्ये आता एक खेळाडू ट्रोल होत आहे. टीम इंडियाचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यर याचे नाव यात समोर आले आहे. युझवेंद्र चहल याने धनश्री आणि त्याच्या नात्यात दुरावा आला आहे की, नाही या चर्चा थांबवण्याचा प्रयत्न केला आहे. पण सोशल मीडियावर चाहते भारतीय युवा फलंदाज श्रेयस अय्यरला ट्रोल करत आहेत.
धनश्री ही उत्तम डान्सर आहे. तिने तिचा आणि श्रेयस अय्यरचा एकत्र डान्स असलेला एक व्हिडिओही शेअर केला होता. त्यावेळी अनेकांनी यावर कमेंट्स केल्या होत्या. त्यामुळेच धनश्री आणि युझवेंद्र चहल यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असल्याचा चाहत्यांचा समज झाला आहे.
त्यांनतर युझवेंद्र चहलने एक इन्स्टा स्टोरी शेअर करत या बातम्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. “तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की, आमच्या नात्याशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. कृपया त्या इथेच थांबवा,” असे त्याने आपल्या स्टोरीमध्ये म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
नरेंद्र मोदींनंतर फडणवीसच सक्षम नेतृत्त्व; फडणवीसांना पुण्यातून दिल्लीला पाठवा; ब्राह्मण महासंघाची मागणी
होमपीचवर शहाजीबापू पाटलांना शिवसेना करणार चारीमुंड्या चीत; खुद्द उद्धव ठाकरे मैदानात
‘संतोष बांगर पुन्हा निवडून आले तर माझी प्रॉपर्टी दान करेन, आणि मुख्यमंत्र्यांना…,’ आक्रमक युवासेनेने दिलं ओपेन चॅलेंज
गोविंदांना आरक्षण देण्याच्या निर्णयाला श्रीकांत शिंदेंचा विरोध; मुख्यमंत्र्यांना जाहीर इशारा देत म्हणाले…