भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी(Virat Kohli) सध्याचा काळ खूप कठीण चालू आहे. कर्णधार पदावरून पायउतार झाल्यानंतर विराट कोहलीला कोणत्याही सामन्यामध्ये मोठी खेळी करता आली नाही. गेल्या दोन वर्षात विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एक देखील शतक झळकावता आलेलं नाही.(yuvraj singh write letter to virat kohli)
यामुळे भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीवर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. सध्या विराट कोहलीचा क्रिकेट सामन्यांमध्ये(Match) फॉर्म चांगला नाही त्यामुळे त्याचे भारतीय संघातील स्थान धोक्यात आले आहे, अशी चर्चा सध्या सुरु आहे. या वातावरणात भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने(Yuvraj Singh) विराट कोहलीसाठी खास पत्र लिहिले आहे.
या पत्रासोबत युवीने विराटसाठी खास भेट म्हणून बूट पाठवले आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने या पत्रात लिहिले आहे की, “तू माझ्यासाठी नेहमीच चिकू राहशील आणि जगासाठी किंग कोहली.” भारतीय खेळाडू विराट कोहलीने सप्टेंबर २०२१ ते जानेवारी २०२२ या काळात तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचे कर्णधारपद सोडले आणि आता तो एक फलंदाज म्हणून संघाशी जोडला गेला आहे.
माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने आपल्या पत्रात लिहिले आहे की, “विराट, मी तुला क्रिकेटर आणि माणूस म्हणून ग्रो होताना पाहिले आहे. नेटवर दिग्गजांच्या खांद्याला खांदा लावून खेळणारा एक तरुण मुलगा आता नव्या पिढीसाठी लेजंड बनला आहे. मैदानावर क्रिकेटबद्दलची आवड आणि शिस्त, तसेच या खेळाप्रती तुझे समर्पण देशातील प्रत्येक तरुणाला बॅट उचलून निळ्या जर्सीमध्ये खेळण्यासाठी प्रेरित करते.
“तु प्रत्येक वर्षी तुझ्या क्रिकेटचा स्तर उंचावला आहे आणि अनेक बाबतीत यश संपादन केले आहे. तु एक उत्तम कर्णधार आणि महान नेता आहेस”, असे युवराज सिंगने पत्रात लिहिले आहे. युवराजने पुढे लिहिले की, “मला तुझ्या आणखी अनेक धावा पाहायच्या आहेत. मी आनंदी आहे की मी तुझ्याशी एक सहकारी आणि मित्र म्हणून नाते निर्माण केले आहे.”
“एकत्र धावा काढणे, लोकांचे पाय खेचणे, पंजाबी गाण्यांवर नाचणे आणि मालिका जिंकणे, हे सर्व आम्ही मिळून केले आहे. तू माझ्यासाठी नेहमीच चिकू आहेस. ती आग तुझ्या आत सतत ठेव. तू सुपरस्टार आहेस, तुझ्यासाठी हे खास गोल्डन बूट आहेत. तू आपल्या देशाची मान अशीच उंचावत राहा”, असे भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने पत्रात लिहिले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
तहसीलदारासाठी महिला कॉन्स्टेबलने नवऱ्याला सोडले अन् त्याने तिलाच संपवलं; वाचा नक्की काय घडलं
तुमच्याही कानात खाज येत असेल तर दुर्लश करू नका, वाचा त्यावरील उपाय आणि कारणे
मलायकाच्या फिगरसमोर सगळे झाले फेल, बिकीनीमधील हॉट फोटो पाहून तु्म्हीही घायाळ व्हाल