बॉलीवूडच्या ‘या’ ब्युटीसोबत युवराज सिंगला करायचे होते लग्न पण….

फिल्म इंडस्ट्री आणि क्रिकेटचे एक वेगळेच नाते आहे. ही दोन्ही क्षेत्रे खुप प्रसिद्ध आहेत. क्रिकेटपटू आणि बॉलीवूड अभिनेत्रींचे अफेअर असणे यात काही नवीन नाही. अनेक क्रिकेटर बॉलीवूड अभिनेत्रींंच्या सुंदरतेवर घायाळ झाले आहेत.

क्रिकेटपटू आणि अभिनेत्रींचे अफेअर ही खुप जास्त चर्चेत असणारी गोष्ट आहे. अनेक क्रिकेटपटूंनी बॉलीवूड अभिनेत्रींना डेट केले आहे. असेच एक नाव म्हणजे युवराज सिंग. युवराज सिंगने अनेक बॉलीवूडमध्ये अभिनेत्रींना डेट केले आहे.

युवराज सिंग बॉलीवूड अभिनेत्रींना डेट करण्याच्या बाबतीत खुप प्रसिद्ध राहिला आहे. त्याने एकापेक्षा एक सुंदर अभिनेत्रींना डेट केले आहे. जाणून घेऊया कोण आहेत बॉलीवूडच्या अभिनेत्री ज्यांच्यासोबत युवराज सिंगचे अफेअर होते.

१)किम शर्मा – युवराज सिंगने करिअरच्या सुरुवातीला अभिनेत्री किम शर्माला डेट केले आहे. दोघे लगभग चार वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. पण त्यानंतर मात्र या दोघांचे ब्रेकअप झाले. असे बोलले जाते की, किम शर्माच्या रागीट स्वभावामूळे या दोघांचे ब्रेकअप झाले होते.

२)दिपीका पडूकोण – एका वेळी दिपीका पडूकोण आणि क्रिकेटर युवराज सिंगच्या अफेअरची चर्चा देखील मोठ्या प्रमाणावर झाली होती. करिअरच्या सुरुवातीला दिपीका युवराजला डेट करत होती. युवराजच्या अनेक क्रिकेट मॅचेमध्ये दिपीका नक्की जायची.

मॅचनंतर अनेक वेळा या दोघांना एकत्र डिनर करताना पाहिले जायचे. त्यावेळी दिपीका बॉलीवूडमध्ये यशस्वी करिअर बनवण्यासाठी मेहनत करत होती. युवराज सिंगसोबत असलेल्या अफेअरमूळे दिपीका त्यावेळी खुप जास्त चर्चेत देखील आली होती.

३)नेहा धुपिया – युवराज सिंगने बॉलीवूड अभिनेत्री नेहा धुपियाला देखील डेट केले आहे. युवराजच्या सर्वात चर्चेत असणाऱ्या अफेअरमध्ये या अफेअरचा समावेश होतो. दोघे अनेकदा कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसायचे. पण नेहाच्या संशयी स्वभावामूळे या दोघांचे ब्रेकअप झाले होते.

४)रिया सेन – युवीचे नाव अभिनेत्री रिया सेनसोबत देखील जोडले गेले होते. हॉट अँड ग्लॅमर्स रिया सेनसोबत युवराज लग्न करणार आहे. असे बोलले जात होते. पण या दोघांचे अफेअर जास्त काळ टिकू शकले नाही. दोघांचे ब्रेकअप झाले.

५)प्रीती झिंटा – बॉलीवूडची डिंपल ब्युटी प्रीती झिंटासोबत देखील युवराज सिंगचे नाव जोडले गेले होते. हे दोघे आयपीएलच्या एकाच टिममध्ये होते. त्यावेळी या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले होते. युवराजला प्रीती झिंटासोबत लग्न करायचे होते. पण त्याचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

अक्षय खन्नासोबत बॉलीवूडमध्ये लाँच झालेली ‘ही’ अभिनेत्री आज कुठे आहे

सलमान खान आणि रवीना टंडन यांच्यात झाले भांडण; कारण ऐकून तुम्हाला बसेल धक्का

मराठी फिल्म इंडस्ट्रीतले हास्य सम्राट अशोक सराफ यांना मामा कोणी बनवले ?

बॅक स्टेजला लाईटचे काम करणारा ‘हा’ अभिनेता आज आहे टेलिव्हिजनवरील स्टार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.