विराट कोहलीच्या फ्लॅटपेक्षा दुप्पट महाग आहे युवराज सिंहचा फ्लॅट; किंमत वाचून बसेल धक्का

भारताला दोन वर्ल्ड कप जिंकून देण्यात भारताचा माजी खेळाडू युवराज सिंहने महत्वाची भुमिका बजावली होती. युवराज सिंहने निवृत्ती घेतली असली तरी युवराज मुंबईच्या महागड्या अपार्टमेंटमध्ये भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या पुढे आहे.

युवराज सिंह जगातील श्रीमंत क्रिकेटपटूंच्या यादीमध्ये आहे. युवराज त्याची पत्नी आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री हेजल कीचसोबत मुंबईच्या वरळीच्या ओमकार १९७३ या टॉवर्समध्ये राहतो.

मिळालेल्या माहितीनुसार, युवराज सिंहने हे जबरदस्त अपार्टमेंट २०१३ मध्ये खरेदी केले होते. या अपार्टमेटची किंमत तब्बल ६४ कोटी रुपये इतकी आहे. हे अपार्टमेंट मुंबईच्या सर्वात महागड्या अपार्टमेंटपैकी एक आहे.

युवराज सिंहच्या या अलिशान अपार्टमेंटमध्ये एक शानदार लिविंग रुम आहे. तसेच वर्ल्ड क्लास मोनोक्रोम किचन आणि राहण्यासाठी दोन सुंदर बेडरुम आहे. तर कर्णधार विराट कोहलीकडे मुंबईच्या वरळीमध्ये एक फ्लॅट आहे.

विराट कोहली आणि अनुष्का शर्माने वरळीतला हा फ्लॅट २०१६ मध्ये खरेदी केला होता. ७,१७१ स्क्वेअर फुटाचा हा फ्लॅट आहे. ओमकार १९७३ मध्येच ३५ व्या फ्लोअरवर आहे. या अपार्टमेंटमधून पुर्ण मुंबई शहर आणि अरबी समुद्र पाहता येतो. विराट कोहलीच्या अपार्टमेंटची किंमत ३४ कोटी रुपये आहे.

युवराज सिंहचे अपार्टमेंट १६,००० वर्गफुट इतके आहे. युवराज सिंह आणि हेजलचे २०१६ मध्ये लग्न झाले होते, तेव्हापासून ते दोघे या फ्लॅटमध्ये राहतात. या अपार्टमेंटमधून अबरी समुद्र स्पष्ट दिसतो. युवराजची हे अपार्टमेंट खुपच अलिशान आहे.

युवराज सिंहने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केली होती. त्या व्हिडिओमध्ये त्याने त्याच्या बेडरुमची एक झलक दाखवली होती. युवराज सिंहच्या रुममध्ये एक खास प्रकारची लाईट असून ती डिम लाईट आहे.

महत्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! मोदींच्या मंत्रिमंडळात खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता
आश्चर्यच! भगवान विष्णुची सर्वात उंच मुर्ती भारतात नाही, तर ‘या’ मुस्लिम देशात आहे
तु अंतर्वस्त्रे घालायला विसरलीस; हटके लुकमुळे अभिनेत्री प्रियंका उध्वानी झाली ट्रोल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.