पठाण बंधूंची दर्यादिली! कोरोना रूग्णांना मोफत जेवन पुरवताहेत इरफान व युसुफ पठाण

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. रोज साडे तील लाखांपेक्षा जास्त कोरोनाची रुग्णांची वाढ होत आहे. अशा परिस्थितीत देशातील आणि परदेशातील अनेक खेळाडू भारताच्या मदतीला पुढे येत आहे.

गेल्यावर्षी प्रमाणे आता या वर्षीही पठाण बंधू गरजू लोकांच्या मदतीला धावून आले आहे. भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू इरफान पठाण आणि युसुफ पठाण यांनी गरजू लोकांना मोफत अन्न पुरवण्यास सुरुवात केली आहे.

गरीबीतूनवर आलेल्या पठाण कुटुंबियांना समाजाप्रती जाणीव असल्याने ते आपली जबाबदारी योग्य रितीने पार पाडत आहे. गेल्यावर्षीही त्यांनी १००० किलो तांदूळ आणि ७०० किलो बटाटे दान केले होते. तसेच त्यांनी वडोदरा येथील विविध रुग्णालयांना पीपीई किट्स आणि मास्कचे वाटपही केले होते.

आता कोरोनाचे संकट पुन्हा आले असताना पठाण कुटुंबानेही पुन्हा मदत करण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही भावांनी वडिलांच्या नावाने सुरु केलेल्या मेहमुदखान एस पठाण पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून वडोदरा येथील कोरोना रुग्णांना मोफत अन्न पुरण्यास सुरुवात केली आहे. लोकांना कोरोनाच्या काळात धीर न सोडण्याचे आवाहन, पठाण कुटुंबियांनी केले आहे.

दरम्यान, युसुफ पठाण आणि इरफान पठाण क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी भावांपैकी ही एक जोडी आहे. त्यांचे वडिल २५० रुपये मजूरीने काम करायचे. मुलांना क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी खुप त्यांनी खुप मेहनत घेतली होती. ते जुनी बुटं विकत घेऊन त्याला शिलाई मारुन चांगले करुन मुलांना द्यायचे.

महत्वाच्या बातम्या-

कोरोनासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी मदत! विप्रोच्या अझीम प्रेमजींकडून दररोज 22 कोटी
रुग्णालयातच परीक्षेची तयारी करतोय कोरोना रूग्ण, त्याच्या जिद्दीचे कलेक्टरनेही केले कौतूक; म्हणाले..
आईसाठी काय पण! स्मिता पाटीलचा मुलगा प्रतीक बब्बरने छातीवर गोंदवले आईचे नाव

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.