VIDEO: नाद खुळा! काहीच दिवसांमध्ये चहल शिकला भन्नाट डान्स; बायको धनश्रीला पण देतोय डान्समध्ये टक्कर

भारतीय संघाचा खेळाडू युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा तिच्या डान्समुळे नेहमीच चर्चेत असते. धनश्री सोशल मीडियावर खुप ऍक्टीव्ह असते. तिथे ती नेहमी वेगवेगळे डान्सचे व्हिडिओ शेअर करत असते.

आता धनश्रीने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आणि यामध्ये ती चहलसोबत डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये चहल पण मस्त डान्स करताना दिसत आहे. तो धनश्रीसोबत डान्स करताना तिला पण टक्कर देत आहे.

युजवेंद्र चहलने त्याच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंट एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये तो आणि धनश्री मेगान वान डिजकच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. चहल या व्हिडिओमध्ये धनश्रीचे डान्सस्टेप्स पुर्णपणे कॉपी करताना दिसून येत आहे.

धनश्री आता युजवेंद्रची डान्स टिचर झाली आहे. त्यामुळे डान्समध्ये तो आता त्याच्या गुरुला पण टक्कर देत असल्याची चर्चा रंगली आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ११ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. तर साडेचार लाखांपेक्षा जास्त लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक लोकांनी धनश्रीसोबतच चहलच्या डान्सचे पण कौतूक केले आहे. एकाने तर चहल या कोणत्या लाईनमध्ये आला तु असे म्हटले आहे. तर अनेकांनी भाऊ तु क्रिकेट तर नाही ना सोडणार ना, अशा मजेदार कमेंट केल्या आहे.

चहल सध्या क्रिकेटच्या मैदानापासून लांब असल्यामुळे त्याला धनश्रीसोबत व्हिडिओ बनवता आला आहे. पण लवकरच मैदानावर परत येणार आहे. जुलै महिन्यात चहलची मैदानावर वापसी होणार आहे. जुलै महिन्यात भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्व शिखर धवन करणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

विराट कोहलीच्या फ्लॅटपेक्षा दुप्पट महाग आहे युवराज सिंहचा फ्लॅट; किंमत वाचून बसेल धक्का
मोठी बातमी! मोदींच्या मंत्रिमंडळात खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता
‘गजनी’ चित्रपटातील सुंदर अभिनेत्री आठवते का? आज दिसते ‘अशी’ ओळखणे आहे कठिण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.