युट्युबरने प्रेग्नेंट प्रेयसीला थंडीत विना कपड्यांचे बाल्कनीत बसवले, त्यानंतर जो प्रकार घडला…

एका युट्युबरला आपल्या प्रेग्नेंट प्रेयसीच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या युट्युबरने एका लाईव्ह प्रसारणादरम्यान आपल्या प्रेयसीशी खूप क्रूरपने वागल्याचे समोर आले आहे. या ३० वर्षीय युट्युबरने लाईव्ह स्ट्रीमिंगच्यावेळी हायपोथर्मीयाने मारल्याचा दावा केला जात आहे.

हा प्रकार रशियामध्ये घडला आहे. युट्युबर स्टास रिफ्लेवरने त्याची प्रेयसी व्हॅलेंटीना ग्रीगोरिवाला हिला विना कपड्यांचे मायनस झिरो डिग्री तापमानात घराच्या बाल्कनीत बसण्यास भाग पाडले.

मस्कोच्या रक्त गोठवणाऱ्या थंडीत अनेक तास बाल्कनीत केवळ अंतर्वस्त्र अंगावर असताना २८ वर्षीय व्हॅलेंटीनाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्याचे बोलले जात आहे. स्टास रिफ्ले नावाने युट्युबवर फेमस असणाऱ्या स्टॅनिस्लाव रेशेतनिकोव असे त्याचे खरे नाव आहे.

त्याने प्रेयसीशी वाईट व्यवहार केला आणि युट्युवर डोनेशनची मागणी केली होती. लाईव्ह प्रसारण सुरू असताना त्याने तिच्यावर मिरचीचा स्प्रेदेखील मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पोलिसांनी त्याची या सर्व प्रकरणात चौकशी केली आहे. या प्रकरणात कायद्याच्या अंमलबजावणीचा हवाला देत एका रिपोर्टनुसार सांगण्यात आले की, फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मते व्हॅलेंटीनाचा मृत्यू हायपोथर्मीयामुळे झाला आहे. या गुन्ह्याखाली युट्युबरला २ वर्षांची शिक्षा होऊ शकते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.