१२ वर्षाचा असताना ११० रुपये घेऊन मुंबईत पळून आला होता, आता आहे ४० करोडच्या कंपनीचा मालक

 

 

माणसाच्या अंगात जर कष्ट घेण्याची ताकद असेल आणि त्याला जर चिकाटीच्या जोड असेल, तर परिस्थिती कितीही गरिबीची असो तो माणूस एक दिवस नक्कीच त्याची परिस्थिती बदलू शकतो. आजची ही गोष्ट अशाच एका तरुणाची आहे.

मूळ राजस्थानचा असलेल्या या तरुणाचे नाव दुर्गाराम चौधरी असे आहे. १२ वर्षाचा असताना तो मुंबईला पळून आला होता. फुटपाथवर राहिला होता, पण आता त्याच्या जिद्दीवर त्याने वर्षाला ४० कोटींचा टर्नओव्हर असणारी कंपनी उभी केली आहे. चला तर मग आज जाणून घेऊया दुर्गारामची गोष्ट…

दुर्गारामचे आई-वडिल दोघेही शेतकरी होते. पण दुर्गारामला शेती नव्हती करायची, त्याला काहीतरी वेगळे करायचे होते. तेव्हा राजस्थानचे खुप लोकं स्वता:चा व्यवयास करण्यासाठी साऊथला जायचे. तेव्हा त्यानेही एक दिवस साऊथला जाण्याचा निर्णय घेतला.

एकदिवशी कोणाला न सांगता, तो रेल्वेत बसला. दुर्गाराम अहमदाबादच्या रेल्वेत बसलेला असताना तिथे कोणीतरी मुंबईला जाण्याबाबत बोलत होते, तेव्हा त्यानेही मुंबईला येण्याचा निर्णय घेतला. त्याच्याकडे फक्त १५० रुपये होते. भाड्याला ४० रुपये गेले आणि ११० रुपये घेऊन तो मुंबईला आला.

सुरुवातीला ६-७ महिने तो फुटपाथवरच राहिला होता. सीपी टँकजवळ एक मंदीर होते, तिथला प्रसाद खाऊनच तो त्याचे पोट भरत होता. तेव्हा तिथे जवळच एक मंगलकार्यलय होते, तिथे वेटरचे काम तो करायचा त्याला तिथे १५ रुपये मिळायचे.

तिथेच एक दुकानदार होता, ज्याने दुर्गारामला लहान आहे म्हणून एक ऑफिस बॉयची नोकरी मिळवून दिली. तिथे त्याने अडीच वर्ष काम केले. त्याला जेवण बनवता येत होते आणि घरही सांभाळता येत होते, त्यामुळे त्या एका डॉक्टरच्या घरी काम मिळाले.

असे असताना त्या विनस कंपनीत कॅसेट पॅकींचे काम मिळाले. पण काही काळानंतरच एका रेफरन्सने त्याला टी सिरीजमध्ये काम मिळाले, तिथे त्याला कॅसेटच्या मार्केटबद्दल माहिती मिळाली. नोकरी करता करताच त्याने रस्त्यावर कॅसेट विकण्यास सुरुवात केली. त्यावर त्याला चांगले कमिशन मिळू लागले.

२००२ पर्यंत त्याने टि सिरीज सोडले आणि कॅसेट विकण्यावरच भर दिला. २००४ पर्यंत त्याच्या दोन कॅसेटच्या दुकान झाल्या होत्या. कंपनीत काम करत असताना त्याची अनेक कलाकारांशी चांगली मैत्री झाली होती.

त्यानंतर २००५ मध्ये रिंगटोन आणि कॉलर ट्युनचा ट्रेंड सुरु झाला. तेव्हा त्याच्या  असे लक्षात आले की बॉलीवूडचे गाणे खुप लोक डाऊनलोड करत होते, तर रिजनल गाणे किती डाऊनलोड होतील, त्यामुळे राजस्थानी, गुजराती गाणे बनवणाऱ्या कंपन्यांना भेटण्यास सुरुवात केली. त्यांचे गाणे घेऊन ते गाणे डिजीटलमध्ये कन्वर्ट करण्याचे काम त्याने सुरु केले.

२००६ मध्ये एक गुजराती गाणे आले होते, तेव्हा त्याने कंपनीशी डिल करुन हे गाणे कन्वर्ट केले, हे गाण्याला खुप हिट्स मिळाल्या होत्या त्यामुळे या डीलमधून त्यांना २० लाख रुपयांचा फायदा झाला, त्यातुन ३० टक्के कमिशन हंगामा कंपनीला मिळाल्याने त्याचा प्रत्येक कंटेंट अपलोड हंगामावरुन डाऊनलोड केला.

पुढे युट्युब आल्याने त्याने हंगामाची नोकरी सोडली आणि स्वता:ची कंपनी सुरु केली. त्याने रिजनल कटेंट मोठ्या प्रमाणात युट्युबवर आणण्यास सुरुवात केली, त्यानंतर तो कोलकता, आसाम आणि ओडीसाला ही गेला, तिथल्या रिजनल कटेंटलाही त्याने युट्युबच्या प्लॅटफॉर्मवर आणण्यास सुरुवात केली.

२०१७ मध्ये त्याने एनिमेशन फर्म पण सुरु केली. सध्या त्याच्याकडे ६५ कर्मचारी कामाला आहे, तर त्याच्या कंपनीची वार्षिक उलाढाल ४० कोटींपेक्षा जास्त आहे. दुर्गारामचा हा संघर्षमय प्रवास अनेकांना प्रेरणादेणारा आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.