युट्युबरने निर्दयपणे कुत्र्याला फुगे बांधून हवेत उडवत काढला व्हिडिओ; पोलिसांनी केली अटक

सोशल मीडियार रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. रोज लाखोंच्या संख्येने अपलोड होणाऱ्या व्हिडिओंमध्ये काही व्हिडिओ खुप चर्चेचा विषय ठरतात. युट्युबवरचेही काही व्हिडिओ व्हायरल होत असतात.

आता सध्याला असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्या व्हिडिओमुळे एका युट्युबरला पोलिसांनी अटक केली आहे. युट्युबरने थोडेफार व्ह्युज मिळवण्यासाठी आपल्या कुत्र्याला फुगे बांधून हवेत उडवले होते. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे.

ही घटना दिल्लीतील आहे. एका युट्युबरने प्रसिद्धी मिळवण्यासाठी आपल्या कुत्र्याला फुगे बांधून त्याला उडवले होते. त्यानंतर त्याने या कुत्र्यासा त्रास दिल्याची तक्रार मालवीय पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यामुळे आता पोलिसांनी या युट्युबरला अटक केले आहे.

पिपल्स फॉर ऍनिमल सोसायटी या संस्थेच्या गौरव गुप्ता यांनी ही तक्रार नोंदवली होती. गौरव शर्मा या युट्युबरने हेलियमच्या फुग्याला पाळीव कुत्रा बांधला होता. तसेच ते फुगे त्याने हवेत सोडले होते. त्यामुळे तो कुत्राही हवेत उडू लागला होता.

कुत्र्याला हवेत उडवल्यामुळे त्याचा जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न गौरवने केला होता, अशी तक्रार गौरव गुप्ता यांनी पोलिस ठाण्यात केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, त्यानंतर गौरव गुप्ता यांनी ही तक्रार नोंदवली आहे.

आरोपी गौरव शर्मा हा मालवीय नगरमधील पंचशील विहारमध्ये राहतो. मी एक युट्युबर आहे, त्यामुळे मी असा एक व्हिडिओ बनवला होता, अशी प्रतिक्रिया गौरव शर्माने या सर्व प्रकणावर दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

वाद-विवादाचे भंडार आदित्य नारायण म्हणण्यास हरकत नाही, जाणून घ्या त्याचे आजवरचे वादविवाद
करण जोहरच्या एकूण संपत्तीचा आकडा वाचून तुमची झोप उडेल; आहे करोडोंच्या संपत्तीचा मालक
एकेकाळी किस केल्यामुळे जेलमध्ये पाठवलेल्या राखीने आता मिकासिंगसोबत केले असे काही की…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.