मुंबई | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अकाऊंटवर यूट्यूबने बुधवारी तात्पुरत्या स्वरुपाची बंदी घातली आहे. युट्यूबने ट्रम्प यांच्यावर सात दिवसांसाठी बंदी घातली आहे. त्यामुळे ट्रम्प यांना सात दिवस युट्यूबवर एकही व्हिडीओ अपलोड करता येणार नाही.
ट्रम्प यांच्या चॅनेलवरुन अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ हा हिंसेला प्रोत्साहन देत असल्याचे कारण देत यूट्यूबने ही कारवाई केल्याचे म्हटले आहे. हिंसा भडकण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही ट्रम्प यांचा नवा व्हिडीओ युट्यूबवरून काढून टाकत आहोत. कारण त्यांनी आमच्या धोरणांचे उल्लंघन केले आहे, असे युट्यूबने म्हंटले आहे.
याचबरोबर ‘या चॅनेलवरुन आता किमान सात दिवस नवीन कंटेट अपलोड करता येणार नाही,’ असेही कंपनीने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये आहे. यापूर्वीच ट्रम्प यांचे खाते ट्विटरने बंद केले होते. फेसबुक, इन्स्टाग्रामनेही ट्रम्प यांचे खाते बंद केले.
ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट बंद करण्याच्या निर्णयामागे आहे ‘ही’ भारतीय महिला
अमेरिका संसदेवर ट्रम्प समर्थकांकडून करण्यात आलेल्या अभुतपूर्व गोंधळ आणि त्यानंतर झालेल्या हिंसक घडामोडींमुळे अशाच प्रकारची कोणतीही घटना भविष्यात घडू नये, यासाठी खबदारी म्हणून ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवर बंदीची कारवाई करण्यात आली आहे.
ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट कायमचे सस्पेंड करण्यामागे भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक असणाऱ्या विजया गड्डे यांची महत्वाची भूमिका असल्याची माहिती समोर येत आहे. ४५ वर्षीय विजया या ट्विटरमध्ये मोठ्या पदावर कामाला असून ट्रम्प यांचे अकाऊंट बंद करण्यासाठी त्यांनी महत्वाची भूमिका बजावल्याची माहिती मिळत आहे.
ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवर बंदीची कारवाई केल्यानंतर त्यांनी एक ट्विट केले आहे. ट्विटमध्ये या म्हणतात, ‘डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन अधिक हिंसा पसरवण्याची शक्यता असल्याने त्यांचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं आहे.’
महत्त्वाच्या बातम्या
‘हिंदू धर्मात दोन पत्नी अमान्य असतील तर भाजपचे नेतेही टेन्शनमध्ये येतील’
…अन् आदर पूनावाला झाले भावूक; शेअर केला कर्मचाऱ्यांसोबतचा इमोशनल फोटो
धनंजय मुंडेंवर बला.त्काराचे आरोप करणारी रेणू शर्मा आहे तरी कोण? घ्या जाणून