तुमचे काम महाराष्ट्राची मान उंचावणारे आहे! भाजपच्या शेलारांनी केले चक्क ठाकरेंचे कौतूक

 

मुंबई | ठाकरे सरकार आल्यापासून विरोधी पक्षाकडून नेहमीच ठाकरे सरकारवर टीका केली जात आहे. यात भाजप नेते आशिष शेलारही सरकारच्या कामांवर प्रश्न चिन्ह उपस्थित करत टिका करताना दिसून येत असतात.

यंदा मात्र आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांचे कौतूक केले आहे. तेजस ठाकरे यांचे काम महाराष्ट्राची मान उंचावणारे आहे, असे म्हणत त्यांनी तेजस ठाकरे यांचे कौतूक केले आहे. त्यांनी याबाबत एक ट्विट केले आहे.

जीवसृष्टीला निसर्गाने अफाट वैविध्य आणि जगण्याचे विलक्षण रंग दिले. त्या अज्ञात अविष्कारांचे रंग तेजस उध्दव ठाकरे हे जगासमोर आणत आहेत. त्यांनी सोनेरी केसाच्या माशाची चौथी “हिरण्यकेशी”प्रजाती शोधली. त्यांचे हे काम महाराष्ट्राची मान उंचावणारे आहे! ग्रेट!, असे ट्विट आशिष शेलार यांनी केले आहे.

दरम्यान, संपूर्ण कुटूंब राजकारणात असताना तेजस ठाकरे हे राजकारणापासून लांब असल्याचे आपल्याला दिसून येते. तेजस ठाकरे यांची आवड ही जैवविविधतेतील संशोधनात आहे.

तेजस यांनी नुकतीच माशाची एक प्रजाती शोधून काढली आहे. अंबोली गावातील हिरण्यकश नदीमध्ये त्यांनी सोनेरी केस असणारा एक नवीन मासा शोधला आहे. तेजस ठाकरे यांनी लावलेल्या या संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील जीवशास्त्रासंदर्भातील मासिकांनीही मान्यता दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

अमृतापेक्षा कमी नाही देशी गाईचे दूध; मेंदू व पोटाच्या विकारांवर तर रामबाण; जाणून घ्या फायदे

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय

राष्ट्रवादी प्रवेशाबाबत खुद्द एकनाथ खडसेंनी सोडले मौन, म्हणाले…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.