Share

तुमच्या ‘या’ सवयींमुळे वयाच्या आधीच तुम्ही दिसू शकता म्हातारे; वाचा त्यावरील उपाय …

रोजच्या धावपळीत स्त्रिया आणि पुरुष आपल्या शरीराकडे आवश्यक तेवढं लक्ष देत नाहीत. त्यामुळे त्याचा परिणाम कालांतराने त्यांच्या शरीरावर होताना दिसतो. वयाच्या आधीच केस पांढरे होणे, गळणे हा त्यातीलच एक प्रकार आहे. आज केसांच्या या समस्येबद्दल आम्ही तुम्हाला काही गोष्टी शेअर करणार आहोत.

आजकाल केस गळणे, केस लवकर पांढरे होणे, ड्राय पडणे या समस्या बऱ्याच तरुण पुरुष आणि स्त्रियांमध्ये आढळून येतात. शरीरावर केस हा असा भाग आहे की आपलं संपूर्ण सौंदर्य त्यावर टिकून राहतं. मात्र, सध्याची आरोग्यशैली पाहता केस पांढरे होणं सामान्य झालं आहे.

पण जेव्हा पांढऱ्या केसांचं ग्रहण लागतं तेव्हा मन चलबिचल होतं. काही लोकं याला अनुवांशिक असल्याचं मानतात. तर काहीजण पांढऱ्या केसांशी तडजोड करतात. मात्र या समस्येतून सहज सुटका होऊ शकते. त्यासाठी तुम्हाला तुमचा रोजचा आहार सुधारणं आवश्यक आहे.

पांढऱ्या केसांची समस्या निर्माण होण्यामागे मुख्य कारण म्हणजे व्हिटामिनची कमतरता. तुम्ही योग्य आहार घेऊन यापासून स्वतःची सुटका करु शकता. तुमच्या शरीरात जर आयरनची कमतरता असेल तर त्याचा केसांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असतो.

केस गळणे, तुटणे आणि केस पांढरे होणे देखील बी १२ व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होत असते. त्यामुळे ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही दूध, दही, चीज, सोयाबीन, ब्रोकोली आणि मशरूम खाण्यास सुरुवात करावी. रोज आलटून पालटून याचा आहारात समावेश करावा.

तसेच, धूम्रपानाच्या सवयीमुळेही देखील तुमचे केस पातळ होतात. धूम्रपान केल्यानं डोक्याच्या भागातील रक्तप्रवाह कमी होतो. याव्यतिरिक्त धूम्रपानामुळे ऑक्सिडेटिव स्ट्रेस देखील वाढतो. यामुळे केसांच्या वाढीवर वाईट परिणाम होतात. त्यामुळे धूम्रपान टाळावे.

नाश्ता न करण्याच्या सवयीमुळे सुद्धा केस पातळ आणि कमकुवत होऊ शकतात. निरोगी आरोग्य आणि केसांसाठी पौष्टिक नाश्त्याचे सेवन करणं अतिशय आवश्यक आहे. नाश्त्यातील पौष्टिक खाद्यपदार्थांद्वारे आपल्या शरीराला पुरेशा प्रमाणात पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो.

इतर आरोग्य

Join WhatsApp

Join Now