तुमच्या पायाला ‘या’ समस्या जाणवत असतील तर तुम्हाला होऊ शकतो गंभीर आजार, वाचा..

आपल्या शरीरातील सर्वच अवयव आपल्यासाठी महत्वाचे असतात. तसेच आपण आपल्या पायांची काळजी ही घेत असतो. मात्र तुमच्या पायांमध्ये काय समस्या जाणवत असेल तर तुम्हाला डायबेटीज सारखे आजार होऊ शकतात , त्याकडे दुर्लक्ष करत असाल तर तुम्हाला अनेक गंभीर आजार होऊ शकतात. ते, कशा प्रकारे आपण जाणून घेऊयात.

पाय सुजणे हे डायबेटीजचे सामान्य लक्षणे मानले जातात. सतत तुमच्या पायाला सूज येत असेल तर ती डायबेटीजची समस्या असल्याची शक्यता आहे. कारण रक्तात साखरेची मात्रा वाढल्यानंतर शरीरातील विविध भागांमध्ये रक्तपुरवठा होत नाही. ज्यामुळे पायांना सूज येऊ शकते

पायाच्या त्वचेची जळजळ होणे डायबेटीजमध्ये तुमच्या पायाच्या त्वचेची जळजळ होऊ शकते. याचे कारण असे की, डायबेटीजमुळे होणारे यीस्ट इन्फेक्शन, कोरडी त्वचा या समस्या कारणीभूत असतात. यामुळे तळापायाची त्वचाही जास्त जळजळते. त्यामुळे जर पायांना अशी जळजळ जाणवत असेल तर तुम्ही त्वरित डॉक्टरचा सल्ला घ्या.

जर तुमच्या पायांवर आपोआप जखमा होत असतील किंवा एखादी छोटीशी जखम मोठी होत असेल तर तुम्ही सावध राहिले पाहिजे. ब्लड शुगरचे प्रमाण वाढले की बॅक्टेरियांचे प्रमाण वाढते. यामुळे पायांपर्यंत पुरेसा रक्तप्रवाह होत नाही. यामुळेच जखमा होण्याची शक्यता असते.

जेव्हा शरीरात रक्तातील साखरेची पातळी वाढते तेव्हा शरीराच्या नसांना कमकुवत होतात. त्यांची संवेदनाही कमी होते. परिणामी पाय सुन्न होण्याची समस्या आढळते. त्यामुळे तुमच्या पायाला काहीही त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

ताज्या बातम्या

…तर काँग्रेसने सरकारचा पाठिंबा काढावा! रामदास आठवले यांच्या वक्तव्याने खळबळ

ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंबाबत आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट करणाऱ्या मराठी अभिनेत्याला अटक

सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यावर आता आलीय उपासमारीची वेळ, घर खर्चासाठीही नाहीत पैसे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.