साहेब तुम्ही काही करू नका, तुमचे कारखाने हवेतला ऑक्सिजनही सोडणार नाहीत; शरद पवारांवर टिकास्र

मुंबई । राज्यात कोरोनाने हाहाकार उडवला आहे. असे असताना बेड आणि ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मोठी समस्या उद्भवली आहे. केंद्राकडे देखील याबाबत मागणी करून पाठपुरावा सुरू आहे. यामुळे परिस्थिती हाताबाहेर चालली आहे.

आता याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील साखर कारखान्यांना पत्र लिहित ऑक्सिजन निर्मितीसाठी पत्र लिहिले आहे. सर्व सहकारी कारखाने तसेच खाजगी कारखान्यांना पत्र पाठवण्यात आले आहे.

खासदार शरद पवारांनी मांजरीतल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून साखर कारखान्यांना पत्र पाठवण्यात आले आहे. यावरून त्यांच्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे.

ते म्हणाले, आपण काही करू नका महाराष्ट्राचे डॉक्टर्स आणि या क्षेत्रातील इंडस्ट्रीज ह्या विषयाचा मार्ग काढतील. तुमचे साखर कारखाने या विषयात जर घुसले तर माणसासाठी हवेतला ऑक्सिजन पण सोडणार नाही, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.

पुढे ते म्हणाले, सॅनिटायझर बनवण्याच्या नावाखाली साखरकारखान्यांनी महाराष्ट्राचे पैसे गिळले असतील, असा आरोपही राणेंनी यावेळी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते राज्य सरकारवर जोरदार टीका करत आहेत.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची कमतरता भासू लागली आहे. यामुळे अनेक रुग्णांचे जीव गेले आहेत. यामुळे विरोधक राज्य सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही.

ताज्या बातम्या

ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्यावर काय करावे, जाणून घ्या आरोग्य मंत्रालयांनी दिलीय महत्वाची माहिती

कोरोना झालाय.? घाबरू नका, १०५ वर्षीय आजोबाही झालेत बरे, फक्त या गोष्टींकडे लक्ष द्या

“महाराष्ट्रात कोविड मृत्यु तांडव सुरु, राजेश टोपेंना घरी बसवलं पाहिजे”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.