भररस्त्यात कॅब ड्रायव्हरला मारहाण करणाऱ्या त्या तरुणीवर गुन्हा दाखल, वाचा संपूर्ण प्रकरण

लखनऊ । सोशल मीडियावर दररोज अनेक वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशाच प्रकारे सध्या सोशल मीडियावर एका तरुणीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुणी भररस्त्यात गाडी चालकासोबत वाद घालताना दिसत आहे.

तेसच या व्हिडिओमध्ये ही तरुणी गाडी चालकाला पोलिसांसमोर मारहाण करत असल्याचे देखील दिसत आहे. व्हायरल होणारा हा व्हिडीओ लखनऊ मधील अवध क्रॉसिंगजवळील सिग्नलचा आहे. क्रॉसिंगजवळ एक तरुणी रस्ता पार करत असताना अचानक एका कॅबच्या समोर आली.

यावेळी कॅब चालकाने पटकन ब्रेक लावत गाडी थांबवली. यानंतर तरुणीने कॅब चालकाला गाडीतून खाली खेचत त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. एक तरुण हा वाद मिटवण्यासाठी आला असता तरुणीने त्याच्या देखील कानाखाली लगावली.

यावेळी अवध क्रॉसिंगजवळ बरीच गर्दी जमली होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून या तरुणीवर टीका होऊ लागली आहे. तसेच या उद्धट तरुणीवर कारवाई केली जावी, अशी देखील मागणी होत आहे.

दरम्यान, कृष्णानगर पोलीस ठाण्यात या तरुणीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच हा व्हिडीओ समोर आल्यानंतर #ArrestLukcknowgirl अला हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला आहे. या मुलीला अनेक जण टीका करताना दिसून येत आहेत.

ताज्या बातम्या

मोठी बातमी! आत्महत्येपूर्वी पूजा चव्हाण संजय राठोडांशी ९० मिनिटं बोलली, धक्कादायक माहिती उघड

धक्कादायक! पोहण्यात पटाईत असूनही महाराष्ट्रातील नेव्ही ऑफिसर धबधब्यात गेला वाहून, शोधकार्य सुरू

आपण कोणाच्या अंगावर जात नाही आणि कोणी आलं तर सोडत नाही- देवेंद्र फडणवीस

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.