घरच्या गरीब परिस्थितीमुळे शिक्षण सोडावे लागले. त्यानंतर घरात बसून घरच्यांचे टोमणे खाण्याशिवाय पर्याय नव्हता. घरखर्च भागवण्यासाठी एकाने सेतु केंद्रात तर दुसऱ्याने बँकेत पिग्मी एजंट म्हणुन काम सुरू केले. पण तुटपूंज्या पगारावर घर चालवता येईना. अखेर दोघांनीही नोकऱ्या सोडुन बँकेची स्थापना करण्याचं ठरवलं. यात यशस्वी होऊन त्यांनी गावातील तरूणांनाही बँकेत नोकऱ्या दिल्या.
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील मुरमा या गावातील गणेश मापारे व मनोज मापारे या दोन तरूणांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ‘शिवमुद्रा अर्बन’ नावाने बँक सुरू केली. त्याचबरोबर त्यांच्यासारखचं रोजगारासाठी धडपड करणाऱ्या तरूण तरूणींना बँकेत नोकऱ्या देऊन त्यांनी आदर्श निर्माण केला.
घरच्या परिस्थितीमुळे दहावीनंतर शाळा सोडुन दिली. शेतीतील कामे येत नसल्याने मित्रमंडळी, नातेवाकईक सतत टोमणे मारायचे. छोट्या मोठ्या नोकऱ्या करून घर चालवणे कठीण होऊन बसले. त्यानंतर दोघांनी काहीतरी वेगळं करायचं ठरवलं. बँकेकडुन कर्ज घेवून त्यांनी ‘शिवमुद्रा अर्बन’ नावाने बँक सुरू करण्याचे ठरवले. नोंदणी प्रकिया पूर्ण झाल्यावर बँक सुरू झाली. गणेश मापारे अध्यक्ष म्हणुन तर मनोज मापारे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कामकाज पाहु लागले.
‘शिवमुद्रा अर्बन’ या बँकेत दोन वर्षात १६०० खातेदारांनी खाते उघडले आहे. बँकेत दिडशे कोटींची आतापर्यंत उलाढाल झाली आहे. छोट्या उद्योगांना एक कोटी रूपयांचे कर्जवाटप केले आहे. महिला बचतगटासाठी बँकेकडुन कर्ज वाटत करण्यात येत आहे. व्यावसायिकांसाठी रोजच्या बचती जमा करण्याची सुविधा बँकेने सूरू केली आहे.
केवळ बँक सूरू करून हे दोघे थांबले नाहीत तर, त्यांनी दुग्धव्यवसायात पाऊल टाकले आहे. ११ म्हशी खरेदी करून महिन्याकाठी एक लाख वीस हजारांचे उत्पन्न कमावतात. म्हशींच्या देखभालीचा खर्च ७० हजार वजा जाता ५० हजारांचा नफा त्यांना मिळतो. जिद्द व चिकाटीच्या जोरावर कोट्यावधींची उलाढाल करणाऱ्या या तरूणांचा आदर्श घेण्यासारखा आहे.
महत्तवाच्या बातम्या-
बापरे! अवघ्या काही वर्षांमध्येच कियारा अडवाणी झाली करोडोंंच्या संपत्तीची मालकीण; बघा घराचे फोटो
भारतात चालू वर्षात ‘या’ क्षेत्रातील नोकऱ्यांना असेल जास्त मागणी, वाचा सविस्तर
मनसे जोमात सरकार कोमात! राज ठाकरेंच्या सुरक्षेसाठी ‘महाराष्ट्र रक्षक’ तैनात
…अन् सिरम इन्स्टिट्यूटच्या अधिकाऱ्याला भावना अनावर; ‘आमच्या सर्वांच्या कष्टाचे चीज झाले’