तरुणांनो गावात असून बेरोजगार असाल, तर सुरू करा ‘हे’ तीन व्यवसाय आणि कमवा लाखो रुपये…

 

मुंबई | कोरोनाच्या संकटात अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तसेच नोकऱ्या गेल्याने अनेक लोक नवीन स्टार्ट अपचा विचार करत आहे, मात्र नक्की व्यवसाय कोणता करावा हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

तसेच कोरोनाच्या संकटात अनेक तरुण आपल्या गावी गेले आहेत. त्यांच्यासाठी आता गावातच एखादा व्यवसाय सुरू करण्याची संधी त्यांना मिळाली आहे.

आज आम्ही तुम्हाला तीन व्यवसाय करण्याच्या आयडिया देणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला शहरात जाऊन काम करण्याची गरज पडणार नाही आणि तुम्ही गावातच राहून पैसे कमावू शकता.

१) किरकोळ विक्रीचे दुकान:-
गावात किरकोळ विक्रीचे दुकान तुम्ही उघडू शकतात. यात तुमच्याकडे कपड्यांचे दुकान, सलून दुकान, किराणा दुकान, शिवणकामाचे दुकान, हार्डवेअर शॉप इत्यादी दुकानांचे पर्याय आहे.

हा एक फायदेशीर आणि नफा मिळवून देणारा व्यवसाय आहे. तसेच तुम्ही गावात राहून मिठाई, फळे आणि भाज्यांची दुकाने देखील उघडू शकतात. गावात या व्यवसायांमधून चांगला नफा मिळतो.

२) झाडूचा व्यवसाय:-
झाडूचा व्यवसाय एक तुम्हाला चांगला पर्याय आहे. शाळा, कार्यालय, दुकाने, घर प्रत्येक ठिकाणी झाडूची गरज असते. रोज स्वच्छता ठेवण्यासाठी झाडू लागत असतो त्यामुळे गावात झाडूचा मागणी मोठ्या प्रमाणात असते.

तुम्ही गावात राहून झाडूचा व्यवसाय सुरू करू शकतात, तसेच यातून तुम्ही चांगला नफा मिळवू शकतात. या व्यवसायासाठी गवत, नारळ किंवा पाम पाने, कॉर्न हूस इत्यादींपासून तुम्ही झाडू बनवू शकतात.

३) पिठाची गिरणी :-
शहरातील लोक गहू, तांदूळ, डाळी आणि रेशनचा साठा ठेवत नसतात, ते बऱ्याचदा रेडिमेड पीठ बाजारातून आणत असतात. मात्र गावात असे होत नाही.

गावातील मोठ्या प्रमाणात लोक गहू, तांदूळ आणि डाळीची खरेदी करतात आणि त्याचा साठा करतात. त्यामुळे त्यांना वारंवार पीठ दळून आणावे लागते. त्यामुळे जर तुम्ही पिठाची गिरणी सुरू केली, तर तुम्हाला यात चांगला नफा मिळू शकतो.

तसेच तुम्ही गावात पीठाच्या गिरणीचा व्यवसाय सुरू केला तर पीठाबरोबरच हरभरा, हळद, मिरची, मका, धणे दळणेही या गिरणीत दळू शकतात. ग्रामीण भागात या व्यवसायामुळे दिवसाला हजारो रुपये कमवता येऊ शकतात.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.