शाब्बास रे पठ्ठया! थंडपेयाची चढ्या दराने विक्री करणाऱ्या हॉटेलला तरूणाने घडवली अद्दल

नाशिक | आपण हॉटेलमध्ये गेल्यावर पाण्याची बाटली, आइस्क्रीम, शीतपेय घेतो. अनेकदा त्याच्यावरील छापील किंमतीपेक्षा जास्त पैसे घेतले जातात. जास्त पैसे घेतल्याचं माहित असूनही उगीच कटकट नको म्हणून आपण काही त्यावर बोलत नाही. पण नाशिक मधील एका तरूणाकडून शीतपेयाच्या छापील किंमतीपेक्षा जास्त पैसे घेतल्याने त्याने हॉटेलला चांगलाच धडा शिकवला आहे.

नाशिकमध्ये राहणारे वैभव देशमुख कुटूंबीयांसोबत मुंबई आग्रा महामार्गावरील न्यू प्रताप हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. जेवणामध्ये थंड पेय म्हणून त्यांनी स्प्राईट मागवले होते. जेवण झाल्यावर त्यांना बिलावरील स्प्राईटची किंमत पाहून धक्काच बसला. मुळ स्प्राईटची किंमत ४० रूपये असताना बिलावर मात्र स्प्राईट ५५ रूपये लावण्यात आले होते.

याबाबत वैभव देशमुख यांनी हॉटेल मॅनेजरला विचारले असता त्यांना शीतपेय थंड करण्याचा चार्जैस लावला आहे. आम्हाला सरकारला टॅक्स द्यावा लागतो. तुम्हाला काय करायचं ते करा अशा उर्मट भाषेत उत्तरं देण्यात आली.

या सर्व प्रकारानंतर हॉटेलने लावलेली वाढीव किंमत भरून वैभव तिथून निघून गेले. पण नेहमी त्यांना आपली फसवणूक झाली आहे आणि यावर आवाज उठवला पाहिजे असं वाटत होतं. अखेर त्यांनी या हॉटेलला ध़डा शिकवायचं ठरवलं आणि मग वैध मापन विभागाकडे तक्रार दाखल केली.

तक्रारीची दखल घेत वैधमापन अधिकाऱ्यांनी तात्काळ संबंधीत हॉटेलमध्ये जाऊन तपास केला असता तिथे छापील किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री होत आल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. वैधमापन विभागाने हॉटेल न्यु प्रतापवर गुन्हा दाखल करून याचा अधिक तपास सूरू केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
भलाईचा जमानाच नाही राहिला! गाईला वाचवण्यासाठी गेले आणि गाईने केली अशी अवस्था, पहा व्हिडीओ
पठ्ठ्याने चांगल्या नोकरीला मारली लाथ;  पेरूची शेती करून यशाला घातली गवसणी
५० तरूणांशी लग्न करून पळून जाणाऱ्या महीलेला पकडले; संपूर्ण टोळीच्याही मुसक्या आवळल्या
शेतकऱ्याचा नाद नाय! दोन भाऊ घरातच केसरची शेती करुन कमवताय लाखो रुपये

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.