VIDEO: संतापलेल्या सांडाच्या अंगावर जाऊन बसला तरुण; पठ्ठ्याची करामत पाहून तुम्ही पण ठोकाल सलाम

सोशल मीडियार रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. रोज लाखोंच्या संख्येने अपलोड होणाऱ्या व्हिडिओंमध्ये काही व्हिडिओ खुप चर्चेचा विषय ठरतात. अनेक व्हिडिओ हे लोकांना हसवणारे पण असतात, तर अनेक व्हिडिओ थरारक असतात.

आता असाच एक थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये एक तरुण थेट सांडावर बसून त्याच्या सवारीची मजा घेत आहे. एककडे तुम्हाला हा व्हिडिओ पाहून हसू येईल, तर दुसरीकडे तुम्हाला थोडीशी भिती पण वाटेल.

आतापर्यंत तुम्ही सांडला राग आलेला किंवा त्याला संतापात दुकानांचे आणि वस्तुंचे नुकसान करताना पाहिले असतील. त्यामुळे सांडाच्या जवळजाण्याची कोणाची हिंमत होत नाही. पण हा व्हिडिओ पाहून तुम्ही पण हैराण व्हाल कारण हा तरुण थेट संतापलेल्या सांडाशी पंगा घेत असून त्याच्यावर बसून सवारी करताना दिसत आहे.

तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकतात, की एक सांड खुप संतापलेला आहे. अशात एक तरुण त्याचे शिंग पकडून थेट त्याच्या अंगावर जाऊन बसतो. इतकेच नाही, तर सांडाने कितीही शिंग हलवले तरी तो तरुण आपला तोल जाऊ देत नाही.

तो तरुण काही वेळ तसाच बसून राहतो आणि काहीवेळानंतर तो पुन्हा आरामात खाली उतरतो. अनेकदा संतापलेल्या सांडाच्या जवळ जाण्याचीही काही लोकांची हिंमत होत नाही. पण या तरुणासारखी कामगिरी करायला खरंच हिंमतच लागते.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ खुप व्हायरल होत आहे. तसेच या व्हिडिओला आता आयपीएस अधिकारी रुपीन शर्मा यांनी शेअर केला आहे. या व्हिडिओवर अनेक लोकांनी कमेंट केल्या असून काही लोकांनी त्या तरुणाच्या हिंमतीचे कौतूक केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

याला म्हणतात जुगाड! बाईने प्रेशर कुकरमध्ये दोन मिनिटांत बनवल्या चपात्या, पहा व्हिडिओ
प्लास्टिक बाटल्यांच्या सहाय्याने पोहोचला दुसऱ्या देशात; सैनिकांना म्हणाला, मी परत जाण्यापेक्षा मरणे पसंत करतो
VIDEO: प्लास्टिक बाटल्यांच्या मदतीने पोहत आला दुसऱ्या देशात, सैनिकांनी पकडताच म्हणाला…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.