धक्कादायक! फेक कॉल केल्यामुळे पोलिसांची तरुणाला मारहाण, तरुणाचा मृत्यू

नागपूर । नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील महेश राऊत नावाच्या ३५ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. काल पोलिसांनी मारहाण केल्यामुळे महेशने आत्महत्या केल्याचा आरोप केला जात आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

फेक कॉल केल्याबद्दल पोलिसांनी मारहाण केल्यानंतर तरुणाने आत्महत्या केल्याचा आरोप केला जात आहे. यामुळे चौकशीची मागणी केली जात आहे. जिल्ह्यातील हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडल्याची माहिती आहे.

आता या मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. महेश राऊतचे नातेवाईक हुडकेश्वर पोलीस स्टेशन परिसरात पोहोचले आहेत. त्यांनी याबाबत जाब विचारला आहे. यामुळे आता हे प्रकरण चांगलेच तापले आहे.

काही दिवसांपूर्वीच नागपूरमधील मनोज ठवकर या तरुणाचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. ते प्रकरण ताजे असतानाच आणखी एक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. हे प्रकरण सुध्दा अशाच प्रकारचे आहे. यामुळे चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

महेश राऊतने १०० नंबरवर फेक कॉल केला, या कारणामुळे पोलिसांनी त्याला मारहाण केल्याचा आरोप होत आहे. यामुळे आता नागपूरमध्ये नेमकं काय चालू आहे, याबाबत नागरिक विचारणा करत आहेत. योग्य कारवाई केली नाही, तर आंदोलन करण्यात येईल, असेही संतप्त नातेवाईकांनी सांगितले.

ताज्या बातम्या

‘आम्ही पॅकेज वाले नाही, असे बोलणाऱ्यांनीच आज पॅकेज जाहीर केले’

धक्कादायक! जोधा अकबर फेम अभिनेत्याला झाला ‘हा’ गंभीर आजार; जीव वाचवण्यासाठी कापावा लागला पाय

बुलेटवर मांडीवर बसून जोडप्याचे चालू होते अश्लील चाळे, गावकऱ्यांनी अडवून चांगलीच जिरवली, पहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.