सोनाक्षी सिन्हाच्या ‘त्या’ व्हिडीओवर अश्लील कमेंट्स करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी उचलला

मुंबई | अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने महिलांच्या सुरक्षे संबंधित शेअर केलेल्या व्हिडीओवर अश्लील कमेंट्स करणाऱ्या तरूणाला मुंबई पोलिसांनीऔरंगाबादेतून शुक्रवारी अटक केली.

शशिकांत गुलाब जाधव असं आरोपीचं नाव आहे. सोनाक्षी सिन्हाने इन्स्टाग्रामवर महिला सुरक्षा, सायबर बुलिंग या विषयांशी संबंधित एक व्हिडीओ शेअर केला होता.

या व्हिडीओमार्फत तिने महिला सुरक्षेबाबत ‘अब बस’ अशी मोहिम सुरु केली. मात्र, तिच्या व्हिडीओवर शशिकांत जाधवने आक्षेपार्ह कमेंट केली.

सोनाक्षीच्या तक्रारीनुसार, ७ ऑगस्ट रोजी तिने इंस्टाग्रामवर महिला सुरक्षेसंबंधित जनजागृतीपर व्हिडीओ शेअर केला होता. त्यावर जाधवने अभिनेत्री बाबत अश्लील टिका टिप्पणी केली. ही बाब लक्षात येताच सोनाक्षीने मुंबईत सायबर पोलिसांकड़े तक्रार दिली.

दरम्यान, आरोपीला अटक केल्यानंतर सोनाक्षीने इन्स्टाग्रामवर पोलिसांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर ऑनलाईन महिलांना छळणाऱ्यांविरोधात अशाच प्रकारे कारवाई केली जाईल, असा इशारा तिने दिला.

त्याचबरोबर महिलांना ऑनलाईन छळणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी एकत्र या, असं आवाहनही अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने केलं आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.