Leopard Attack : सध्या राज्यात बिबट्याच्या हल्ल्यात लोकांचा बळी गेल्याच्या घटना फार वाढल्या आहेत. अशातच एका १९ वर्षीय तरुणीसोबतही असाच प्रकार घडला आहे. शिरूर तालुक्यातील जांबुत येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे.
पूजा नरवडे असे या तरुणीचे नाव आहे. पुजाची घरची परिस्थिती अतिशय बेताची आहे. तिचे वडील गावातील दुकानांमध्ये हमालीचे काम करतात तर तिची आई ही दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करते. विशेष म्हणजे पुजाला थोडे अंधत्व होते, परंतु ती अभ्यासात अतिशय हुशार होती.
जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथे दिलीप वळसे पाटील महाविद्यालयात पूजा शिक्षण घेत होती. ती पदवीच्या द्वितीय वर्षाला होती. खूप शिक्षण घेऊन तिला कलेक्टर व्हायचे होते. मात्र, तिला काळ आडवा आला आणि तिचे हे स्वप्न अर्धवटच राहिले.
भीमाशंकर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील यांना हे सगळे प्रकरण आणि कौटुंबिक परिस्थिती कळल्यानंतर ते गहिवरले. त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. पूजाच्या कुटुंबाला जुन्नरचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या हस्ते दहा लाख रुपये देण्यात आले. तसेच प्रशासनाकडूनही दहा लाख रुपयांची मदत कुटुंबियांना जाहीर करण्यात आली आहे.
यावेळी जांबूतचे सरपंच दत्तात्रय जोरी, बाळासाहेब पाठारे, शांताराम जोरी, राहुल जगताप, प्रशांत जोरी, सागर जोरी, दादाभाऊ फाळके इत्यादी लोकांनी पूजाच्या कुटुंबियांना मदतीचे आवाहन केले आहे. मात्र, मुलगी गेली आता पैशाचे काय असे म्हणत पूजाच्या आईने हंबरडा फोडला.
त्यामुळे उपस्थित सर्वांच्याच डोळ्यांत अश्रू तरळले. पूजाच्या अशा मृत्यूमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. तिच्या मृत्यूमुळे सगळीकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर त्या बिबट्याला ठार मारा अशी मागणी करत ग्रामस्थांनी आंदोलन केले.
महत्वाच्या बातम्या
मुंबई विमानतळावर सापडलं १५ कोटींचे सोन्याचं घबाड, ATS च्या हाती लागली धक्कादायक माहिती
Asia Cup: पुरुषांना नाही जमलं ते महिलांनी करून दाखवलं; ७ व्या वेळी पटकावला आशिया कप, श्रीलंकेचा ८ गडी राखून पराभव
Rohit Sharma : पाकीस्तानविरूद्धच्या सामन्याचे महत्व आम्हालाही माहीत आहे, पण..; कट्टर चाहत्यांना रोहीतने झापले
Harry Potter: सर्वांच्या आवडत्या हॅरी पॉटरच्या ‘हॅग्रीड’चे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन; चाहत्यांवर शोककळा