Share

तलवार अन् कोयत्याने वार करत कंपनीच्या गेटवरच उद्योजकावर हल्ला; घटनेमागील कारण हादरवनारे

नाशिक शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन अल्पवयीन मुलांनी(Children) तलवार आणि कोयत्याने एका उद्योजकाची हत्या केली आहे. नाशिक शहरातील अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेमुळे नाशिक शहरात खळबळ माजली आहे. गेल्या वीस दिवसांमध्ये नाशिक शहरात हत्येची ही आठवी घटना आहे. (young children attack on industrialist nashik )

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक शहरातील अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये नंदकुमार आहेर यांच्या मालकीची ऑटोमोबाइल पार्ट तयार करण्याची छोटी कंपनी आहे. काल सकाळी नेहमी प्रमाणे नंदकुमार आहेर कंपनीत येण्यासाठी घरातून निघाले. कंपनीसमोर येताच नंदकुमार आहेर यांच्यावर काही अल्पवयीन मुलांनी तलवार आणि कोयत्याने वार केले.

यावेळी नंदकुमार आहेर यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे नंदकुमार आहेर यांच्या कंपनीमधील लोक धावत त्या ठिकाणी आले. त्यावेळी नंदकुमार आहेर जखमी अवस्थेत पडले होते. त्यानंतर नंदकुमार आहेर यांना उपचार करण्यासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. पण रुग्णालयात नेण्यापूर्वी वाटेतच नंदकुमार आहेर यांचा मृत्यू झाला आहे.

नाशिक पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्या प्रकरणातील तिन्ही आरोपी अल्पवयीन आहेत. त्यांचे वय २० वर्षे आहे. या हत्या प्रकरणातील आरोपींची आई नंदकुमार आहेर यांच्या कंपनीमध्ये नोकरी करत होती. कंपनीमध्ये नंदकुमार आहेर यांच्याकडून आपला छळ आणि अपमान होत असल्याचे आईने मुलांना सांगितले होते.

आईच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आरोपींनी नंदकुमार आहेर यांची हत्या केल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. तर इतर दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेमुळे अल्पवयीन मुलांच्या गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

मे महिन्यामध्ये नाशिक शहरात हत्येच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या घटनांमुळे नाशिक शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनांमुळे नाशिककर संतापले आहेत. या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नाशिक शहरातील नागरिकांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या :-
आईच्या अपमानाचा कोवळ्या मुलांनी घेतला बदला! उद्योजकावर कोयत्याने वार करत केली हत्या
भाजपने पुन्हा केला पंकजा मुंडेंचा करेक्ट कार्यक्रम; ‘या’ नवीन चेहऱ्यांना दिली संधी, वाचा यादी
..तर कदाचीत ही आपली मराठी माणसांची संपत्ती मातीत मिळेल; वसंत मोरेंचे मदतीचे आवाहन

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now