बुरखा घालून कॉलेजमध्ये फिरत होता तरुण, शिक्षिकांनी त्याला बुटावरुन ओळखले अन् पुढे….

मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यात एक विचित्र प्रकार घडला आहे. एक तरुण एका महाविद्यालात चक्क बुरखाच घालून आला होता, पण ही गोष्ट शिक्षकांच्या लक्षात येताच स्टाफने त्याला पकडले आहे. त्यामुळे सध्या त्या परिसरात त्या तरुणाचीच चर्चा सुरु आहे.

बुरखा परिधान केलेला हा तरुण एका महिलेचा गेटअप करून महाविद्यालयात दाखल झाला होता. तो महिलांच्या खोलीच्या दिशेने जाऊ लागला होता. पण संशय आल्यावर त्याला पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

हे प्रकरण बुरहानपूर जिल्ह्यातील कोतवाली पोलीस स्टेशन परिसरातील शानवाराचे आहे. येथे सेवा सदन नावाचे महाविद्यालय आहे. कोरोनामुळे कॉलेज बराच काळ बंद राहिले. आता हळूहळू महाविद्यालये सुरू होत आहेत. सेवा सदन महाविद्यालय देखील शासनाच्या नियमानुसार ५० टक्के क्षमतेने चालवले जात आहे.

१६ सप्टेंबर रोजी ५० टक्के विद्यार्थ्यांना महाविद्यालयात बोलावले होते. सर्व मुलींमध्ये, कोणीतरी बुरखा घातलेली व्यक्ती कॉलेजमध्ये येताना दिसली. ती महिला कॉमन रूमच्या दिशेने जात होती. पण त्याचे शूज पाहून कॉलेज स्टाफला काही शंका आली. त्याचे वर्तनही थोडे वेगळे वाटत होते.

यानंतर महिला प्राध्यापकांनी प्राचार्यांना माहिती दिली. कर्मचारी जमले. बुरखा परिधान केलेल्या व्यक्तीशी चौकशी सुरू झाली. त्याच्या चेहऱ्यावरून बुरखा काढताच सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. बुरख्यामध्ये एक तरुण होता, विद्यार्थी नव्हता. कॉलेज स्टाफने त्याला ताबडतोब पकडले. पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तरुणाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

कॉलेज मॅनेजमेंटच्या म्हणण्यानुसार, तरुणाने सांगितले की तो कॉलेजमध्ये अशा प्रकारे कुणाला भेटण्यासाठी आला होता. अमर उजालाच्या वृत्तानुसार, तरुणाने प्रथम आपले नाव इम्रान शेख असे सांगितले. मग पोलिसांनी चौकशी केली, मग त्याचे खरे नाव मोहसीन सांगितले.

पोलिसांनी त्याच्याविरुद्ध शांतता भंग केल्याचा गुन्हा दाखल केला. एसडीएम न्यायालयाने त्याला कोठडी सुनावली आहे. कॉलेज व्यवस्थापन म्हणते की, या घटनेनंतर कॉलेज परिसरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबाबत आणखी दक्षता घेतली जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ दिवशी पुणे पुर्णपणे बंद, कठोर निर्बंध लावण्याचा अजितदादांचा आदेश
…म्हणून चंद्रकांत दादा म्हणताय त्यांना माजी मंत्री म्हणू नका; संजय राऊतांनी सांगितली ‘आतली’ गोष्ट
उतारवयात सुरू केली शेती तरीही कमावला बक्कळ नफा, आंब्यांची शेती करून एका वर्षात कमावले १५ लाख

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.