मास्कविना पकडल्यामुळे पोलिसाने कानाखाली मारली, तर तरुणानेही मारले पोलिसाला; घटनेचा व्हिडिओ व्हायरल

देशभरात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे. त्यामुळे सरकार कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी वेगवेगळे उपाय करत आहे. तसेच काही राज्यात सरकारने नागरीकांसाठी कडक निर्बंध लावले आहे.

काही राज्यात संचारबंदी, रात्रीची संचारबंदी, लॉकडाऊन, विकेंड लॉकडाऊन लावण्यात आलेले आहे. अशात काही लोक नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्यावर पोलिसांकडून कडक कारवाई केली जात आहे.

अशातच काही लोक पोलिसांवर हल्ला करत असल्याच्या धक्कादायक घटना घडत आहे. आता अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या कुशीनगर परीसरात घडली आहे. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

पोलिसांनी मास्क न लावणाऱ्याला तरुणाला पकडले होते. तसेच पोलिस त्याच्यावर कारवाई करत होती. त्यामुळे पोलिस अधिकाऱ्याने त्या तरुणाच्या कानाखाली लावली असता, त्याने पोलिस अधिकाऱ्याला मारुन पळ काढला आहे.

कुशीनगर परीसरात पोलिस बंदोबस्त होता. त्यावेळी पोलिस नागरीक नियमांचे उल्लंघन करत तर नाही ना याकडे लक्ष देऊन होते. अशावेळी पोलिसांना एक तरुण विनामास्कचा दिसून आला.

त्यावेळी पोलिस अधिकारी गाडीमध्ये बसलेले होते. असे असताना पोलिसाने त्या तरुणाला बोलावून मास्क लावला नाही, म्हणून कानाखाली मारली. तर हे पाहून तरुण संतापला आणि त्यानेही एसआय अधिकाऱ्याच्या कानाखाली लावली आणि फरार झाला आहे. सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या व्हिडिओवर अनेक लोकांनी कमेंट केल्या आहे. काही लोकांनी यात पोलिस अधिकाऱ्याचीच चुक असल्याचे म्हटले आहे. तर काही लोकांनी ऑन ड्युटी पोलिस अधिकाऱ्याला मारणे हा गुन्हा असल्याचे म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

लोकांना घरी राहायला सांगता मग तुम्ही का निवडणूका घेता; भाजपच्या नेत्याने मोदींना सुनावले
राज कपूरला जमिनीवर झोपणे पडले महागात; भरावा लागला होता मोठा दंड
तुकाराम मुंढे तुम्ही आयुक्त म्हणून पाहीजे होतात; कालच्या दुर्घटनेनंतर नाशिककरांची आर्तहाक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.