नवी दिल्ली |पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्याहुन प्रत्येक नागरिकाला राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियानांतर्गत एक हेल्थ कार्ड दिले जाणार आहे, असे म्हटले होते.
आता हेल्थ कार्ड असेल तरच कोरोना लस मिळणार असल्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. ‘ग्रँड चॅलेंज’च्या वार्षिक सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे संकेत दिले आहे.
डिजिटल हेल्थ आयडीसह डिजिटल नेटवर्कचा वापर करण्यासाठी एक वितरण सिस्टीमवर काम केले जात आहे, याचा वापर करून नागरिकांना लसीकरण केले जाईल, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
भारतात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर खूप कमी आहे. नवीन रुग्णांची संख्याही कमी होत आहे. तसेच कोरोना संसर्गात लस विकसित करण्यात आपण आघाडीवर आहोत, असेही नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
तसेच जागतिक लसीकरण कार्यक्रमात वापरण्यात येणाऱ्या ६० टक्के लसी या भारतात तयार केल्या जाणार आहे, याचीही आठवण नरेंद्र मोदी यांनी करून दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मुख्यमंञी उध्दव ठाकरेंचा व्हिडीओ दाखवत फडणवीसांनी करून दिली ‘त्या’ मागणीची आठवण
१००० एकरात २० हजार मॅट्रिक टन बटाटा; वार्षिक उत्पन्न २५ करोड
‘केंद्राने आमची थकीत देणी दिली तर मदतीसाठी हात पसरण्याची गरज नाही’