Share

बंडखोर नेते एकनाथ शिंदेंची संपत्ती वाचून अवाक व्हाल; ठाण्यात दोन बंगले, ७० लाखांच्या गाड्या…

Eknath Shinde

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत. एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(You will be amazed to read the wealth of rebel leader Eknath Shinde)

शिवसेनेच्या आमदारांप्रमाणे खासदारही बंडखोरी करणार असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेचे काही खासदार शिंदे गटात सामील होण्यासाठी गुवाहाटीला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा वाद निर्माण झाला आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या संपत्तीबाबत काही बातम्या समोर येऊ लागल्या आहेत.

आज आपण शिवसेनेचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपत्तीबाबत जाणून घेणार आहोत. एकनाथ शिंदे यांच्याकडे एकूण ७.५ कोटींची संपत्ती आहे. एकनाथ शिंदे यांच्या मालकीचे ठाण्यात दोन बंगले आहेत. या बंगल्यांची किंमत जवळपास २ कोटी रुपये आहे. याशिवाय एकनाथ शिंदे यांच्या मालकीचे वागळे इस्टेट भागातील किसन नगर चाळीमध्ये एक घर आहे.

तसेच वागळे इस्टेट भागात एकनाथ शिंदे मालकीची प्रॉपर्टी देखील आहे. याव्यतिरिक्त एकनाथ शिंदे यांच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडे स्कॉर्पिओ, इनोवा आणि बलेनो अशा अनेक गाड्या आहेत. या सर्व गाड्यांची किंमत सुमारे ७० लाख रुपये आहे. याशिवाय एकनाथ शिंदे यांच्याकडे सोने देखील आहे.

एकनाथ शिंदे यांच्या पत्नीकडे सुमारे १५ लाख रुपयांचे सोने आहे. तसेच स्वतः एकनाथ शिंदे यांच्या तीन लाख रुपयांचे सोने आहे. एकनाथ शिंदे यांनी घरासाठी कर्ज देखील घेतले आहे. एकनाथ शिंदे यांच्या पत्नीच्या नावावर ८३ लाखांचे कर्ज आहे. याशिवाय शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मालकीची काही इतरही संपत्ती आहे.

एकनाथ शिंदे ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी मतदार संघाचे आमदार आहेत. २००४ सालापासून सलग ४ वेळा एकनाथ शिंदे या मतदार संघातून निवडून आले आहेत. एकनाथ शिंदे महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री आहेत. याशिवाय एकनाथ शिंदे शिवसेनेचे गटनेते देखील होते. पण नुकतंच शिवसेनेकडून त्यांना गटनेते पदावरून हटवण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या :-
ठाण्यात दोन बंगले, ७० लाखांच्या गाड्या, ८० लाखांचं कर्ज; जाणून घ्या एकनाथ शिंदेंच्या संपत्तीबाबत
शिवसेनेच्या ९२ वर्षांच्या फायर ब्रँड आजी मुख्यमंत्र्यांसाठी मैदानात; म्हणाल्या, तो रिक्षावाला…
VIDEO: मुंबईच्या या फलंदाजाने सिद्धू मुसेवालाला वाहिली अनोखी श्रद्धांजली, मैदानावरच कोसळले रडू

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now