दिलदार इशान! सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर इशानने जे केले त्याचा तुम्हालाही अभिमान वाटेल

अहमदाबाद | भारत विरूध्द इंग्लंड यांच्यात दुसरा टी -२० सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. इंग्लंडचा पराभव करत भारताने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. यामध्ये पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात युवा फलंदाज इशान किशनने तुफान खेळी केली आहे.

इशान किशनने ३२ चेंडुमध्ये ५६ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने ४  षटकार आणि ५ चौकार ठोकले आहेत. पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात इशानने धावांचा पाऊस पाडल्याने कर्णधार विराट कोहलीसह अनेकांनी तोंडभरून कौतुक केले आहे.

उत्कृष्ट कामगिरी करून क्रिकेटप्रेमींचे मन जिंकण्याबरोबरचं इशानने त्याच्या कृतीतूनही चाहत्यांवर छाप पाडली आहे. इशानला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आल्यानंतर इशान किशन भावूक झाला आहे. इशान किशनच्या कोचच्या वडिलांचं निधन झालं आहे.

कोचने इशानकडे पहिल्या सामन्यात अर्धशतक तरी करावे अशी अपेक्षा व्यक्त केली होती. इशाननेही धुवादार बॅटिंग करत मैदानात धावांचा पाऊस पाडत कोचची अपेक्षा पुर्ण केली आहे. तसेच त्याने मॅन ऑफ द मॅच पुरस्कार त्यांना अर्पण केला आहे. यातूनच इशान किशन किती मोठ्या मनाचा माणूस आहे हे दिसून येत आहे.

इशान किशन म्हणाला की, “मला मुंबई इंडियन्सच्या संघामध्ये वरिष्ठ खेळाडूंकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांनी मला मोलाचे मार्गदर्शन केले आहे. अखेर मला खेळण्याची संधी मिळाली. या सामन्यात शेवटपर्यंत टिकून राहायचं होतं.”

दरम्यान पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात इशानने ५६ धावा केल्या आहेत. टी -२० सामन्यामध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंच्या यादीत इशान किशन दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

इशान किशन हा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये इशान किशनने झारखंडकडून खेळत चांगली कामगिरी केली आहे. झारखंड संघाचा इशान किशन कर्णधार आहे.
महत्वाच्या बातम्या-
धडाकेबाज खेळी करणाऱ्या इशान किशनचे विराटने केले कौतुक, म्हणाला…
इशान किशनने पदार्पणातच इंग्लीश बॉलर्सच्या उडवल्या चिंधड्या; ३२ चेंडूत ५६ धावांची तुफानी खेळी
…तोपर्यंत स्टेडियममध्ये मॅच बघायला जाणार नाही; इशान किशनच्या आईने केल्या भावना व्यक्त
हिटमॅन रोहीतला डच्चू दिल्याने विरेंद्र सेहवाग कोहलीवर भडकला, म्हणाला…

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.