तुम्हांला माहित आहे का! सुशांतने आत्महत्येपूर्वी केलं होतं ‘हे’ गुगल सर्च?

 

मुंबई। बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या करुन काही आठवडे उलटले आहेत. परंतु, अद्यापही सुशांतच्या आत्महत्येमागील ठोस कारण स्पष्ट झालेले नाही. सुशांतच्या आत्महत्येनंतर गुगलवर डिप्रेशन हा शब्द सर्वाधिक वेळा सर्च केला गेला आहे.

मात्र, सुशांतने आत्महत्येपूर्वी गुगलवर नेमके काय सर्च केले होते, हे त्याच्या मोबाईल फॉरेन्सिक रिपोर्टमधून समोर आले आहे. त्यानुसार, सुशांतने स्वत:चचे नाव सर्च केल्याचे म्हंटले जात आहे.

सुशांतच्या आत्महत्येनंतर आतापर्यंत जवळपास २८ जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. दरम्यान सुशांतचा मोबाईल फॉरेन्सिक रिपोर्ट समोर आला आहे.

या रिपोर्टमध्ये सुशांतने आत्महत्या करण्याच्या काही वेळापूर्वी गुगलवर स्वत:चचे नाव सर्च केले होते, असे ‘झी न्यूज इंडिया’च्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

सुशांतने आत्महत्या करण्यापूर्वी गुगलवर त्याच्यावरील काही आर्टिकल्स आणि काही बातम्या वाचल्या होत्या. सुशांतने १४ जून रोजी सकाळी १०.१५ वाजता हे गुगल सर्च केले होते.

दरम्यान, सुशांतने आत्महत्या केल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. काहींच्या मते, ही आत्महत्या नसून सुशांतची हत्या करण्यात आल्याचे म्हंटले जात आहे. त्यामुळे सुशांतच्या चाहत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.