हिंदी विरूद्ध इतर भाषा वाद पुन्हा पेटला; ‘तुम्हाला हिंदी येत नसेल तर बैठकीतून निघा’

चेन्नई | तुम्हाला हिंदी येत नसेल तर तुम्ही बैठकीतून निघून जा, असे तामिळनाडूमधील योग आणि निसर्गोपचार तज्ञांना मंत्रालयाने आयोजित केलेल्या व्हर्चुअल बैठकीत सांगण्यात आले, असा आरोप द्रमुक पक्षाने केला आहे.

आयुष मंत्रालयाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी द्रमुक पक्षाने केली आहे. हिंदी भाषेच्या सक्तीवरून तामिळनाडूमध्ये एका महिन्यात उद्धभवलेला हा दुसरा वाद आहे.

काही आठवड्यापूर्वीच द्रमुक खासदार कनिमोळी यांना विमानतळावर हिंदी न बोलण्यावरून तुम्ही भारतीय आहेत का?, असा प्रश्न अधिकाऱ्यांनी विचारला होता. त्यानंतर हा प्रकार घडला असल्याचे उघड झाले.

या सगळया प्रकरणाबाबत द्रमुक पक्षाने आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांना पत्र लिहीत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पक्षप्रमुख एम. के. स्टॅलिन यांनीही टीका केली. आयुष मंत्रालयाचे सचिव राजेश कोटेचा यांनी अत्यंत उर्मटपणे 37 तज्ञांना बाहेर जाण्यास सांगणे चुकीचे आहे. त्याच्यासारखा वरिष्ठ अधिकारी भाषेच्या गर्वामुळे इतक्या असंस्कृत पद्धतीने वागतो, हे लाजिरवाणे आहे, असे स्टॅलिन यांनी म्हंटल आहे.

दरम्यान, असे प्रकार पुन्हा घडू नयेत याची काळजी घ्यावी, अशी विनंती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-फिल्म इंडस्ट्रीतमध्ये आल्यानंतर ‘या’ अभिनेत्यांनी आपल्या नावात केला बदल

-ऐकाव ते नवलच! ‘ही’ मुलगी वयाच्या पाचव्या वर्षी झाली होती आई

-देशभक्तीवर शंका घेतल्यामुळे हुतात्मा राजगुरूंनी छातीवर तापलेली सळई ठेवली होती; वाचा पुर्ण प्रसंग

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.