‘या’ शहरात मिळत आहेत फक्त 12 रुपयांमध्ये घर

क्रोएशियाच्या उत्तर प्रदेशातील लेग्राड या शहरात प्रशासनासमोर एक विचित्र समस्या निर्माण झालेली आहे. कमी वाहतुकीच्या सोयीमुळे तेथील लोक आपली घरे सोडत आहेत. लोकांना फक्त एक कुणा किंवा 12 रुपयांत घरे विकायला भाग पाडले जात आहे.

लग्राडचे नगराध्यक्ष इव्हान सबोलिक याबाबतीत म्हणाले की, आमचे शहर एक सीमेवरील शहर बनले असल्याने येथील लोकसंख्या सातत्याने कमी होत आहे. लेग्राड शहराची सीमा हंगेरीला जोडलेली आहे. हे शहर सीमेवर असल्या कारणाने लोक तेथे राहणे सोयीस्कर समजत नाहीत.

रॉयटर्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, देशातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या क्रोएशियामध्ये लग्राड शहर दुसरे स्थान होते. परंतु सुमारे 100 वर्षांपूर्वी ऑस्ट्रो-हंगेरियन साम्राज्य फुटल्यापासून येथील लोकसंख्या सातत्याने कमी होत आहे. लेग्राड शहरात भरपूर प्रमाणात हिरवळ आहे इथे सर्वत्र जंगले आहेत.

या शहरात 2,250 लोक राहतात. 70 वर्षांपूर्वी, आजच्यापेक्षा दुप्पट लोक लग्रड शहरात वास्तव्य करीत होते. पण आता लोक हे शहर सोडून जात आहेत. येथील महापौरांनी सांगितले की नुकतीच एकाचवेळी १ घरे रिकामी करण्यात आली आहेत. या घरांची किंमत जाणून घेतल्यास तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

येथे एका घराची किंमत फक्त 1 कुना किंवा 12 रुपये आहे. यापैकी आतापर्यंत 17 घरे विकली गेली आहेत. यांना तेथील नगरपालिका देखील मदत करत आहे. या शहरात इतके स्वस्त घर मिळत असूनही लोक घर घेण्यास तयार होत नाहीत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.