महाराष्ट्रात सध्या मशिदींवरील भोंग्यावरून राजकारण तापलं आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मुंबईतील मनसे कार्यकर्ते अधिक आक्रमक होताना दिसत आहेत. मुंबई पोलिसांकडून मनसे नेत्यांना अटक करण्यास सुरवात झाली आहे. यादरम्यान उत्तर प्रदेशमधून(Uttar Pradesh) एक मोठी बातमी समोर आली आहे.(yogi government statement on maharshtra governemnt)
उत्तर प्रदेशात सुमारे एक लाख लाऊडस्पीकर उतरवण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला नाव न घेता टोला लगावला आहे. “आम्ही केवळ लाऊडस्पीकरचा प्रश्न सोडवला नाही तर रस्त्यावरील नमाजाचा देखील प्रश्न सोडवला आहे”, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले आहे.
यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, “उत्तर प्रदेशातील विविध धार्मिक स्थळांवरून सुमारे एक लाख लाऊडस्पीकर हटवण्यात आले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात लाऊडस्पीकर काढण्यात आल्यामुळे आता संपूर्ण उत्तर प्रदेशातील आवाजही कमी झाला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे लाऊडस्पीकर काढताना कुठेही वाद झालेला नाही”, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले आहे.
“आम्ही केवळ लाऊडस्पीकरचा प्रश्न सोडवला नाही तर रस्त्यावरील नमाजाचा देखील प्रश्न सोडवला आहे. रस्त्यावर नमाज पठण करू नये, अशा सूचना आम्ही दिल्या होत्या. त्यानुसार आता रस्त्यावर कोणीही नमाज पठण करत नाही”, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले आहे. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्य सरकारचे कौतुक देखील केले आहे. आमच्या सरकारने भोंग्यांचा मुद्दा व्यवस्थित हाताळला, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले आहे.
“यूपीमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या २५ कोटींच्या आसपास आहे. ईदसारख्या मुहूर्तावर देखील मुस्लिम समाजाने कुठेही रस्त्यावर नमाज पठण केलेलं नाही. लोकांनी याबाबतीत पुढाकार घेत रस्त्यांऐवजी घरांमध्ये किंवा मशिदींमध्ये नमाज पठण केलं आहे. मुस्लिम समाजाने उत्तर प्रदेश सरकारने दिलेल्या नव्या आदेशाचे पालन केले आहे”, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्रात सध्या मशिदींवरील भोंग्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे पक्षाकडून महाराष्ट्रात मशिदींवरील भोंग्यबाबत आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीस देखील बजावण्यात आल्या आहेत. तसेच काही मनसे पदाधिकाऱ्यांना मुंबई पोलिसांकडून अटक देखील करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
आमच्या सणांना एक दिवसाची परवानगी, मशिदींवरील भोंग्यांना ३६५ दिवस परवानगी कशी मिळाली? राज ठाकरे आक्रमक
नांदा सौख्यभरे! अखेर विराजस-शिवानीचा विवाहसोहळा संपन्न, पहा लग्नातील खास फोटो
…तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, राज ठाकरे फुकले रणशिंग, भोंगा प्रकरण चिघळणार?