योगी सरकारचा निर्णय, भाजप कार्यकर्त्यांविरोधातील ५ हजाराहून अधिक खटले मागे घेणार

उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. पुढच्या वर्षी ही निवडणूक होणार आहे. यामुळे आतापासूनच भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीत राज्यातील सत्ता कायम ठेवण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.

आता पक्षाने कार्यकर्त्यांना एकत्र करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठी राज्यातील मंत्र्यांना जिल्ह्यांमध्ये दौरे करुन भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यास सांगण्यात आले आहे. यामुळे वातावरण निर्माण होणार आहे.

तसेच मागील सरकारच्या काळात भाजपाच्या कार्यकर्त्यांविरोधात दाखल करण्यात आलेले खटले मागे घेण्याचा निर्णय राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपाने घेतला आहे. यामुळे ५००० हजारहून अधिक गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत.

राज्याचे गृहमंत्री ब्रिजेश पाठक म्हणाले, हे खटले राजकीय हेतूने किंवा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दाखल करण्यात आलेले आहेत. या सर्व खटल्यांचा अभ्यास करुन आम्ही असे खटले मागे घेण्याचा निर्णय़ घेतला आहे. आणि ही प्रक्रिया सुरु राहणार आहे.

यामुळे निवडणुकींचा प्रचार सुरु होण्याआधी कार्यकर्त्यांना समाधानी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. आता त निवडणूकित कोण बाजी मारणार हे लवकरच समजेल. मात्र भाजपने आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे.

भाजपा कार्यकर्त्यांवरोधात दाखल केलेले ५००० हजारहून अधिक खटले मागे घेण्यात येणार आहेत.जुलै महिन्यापर्यंत हे सर्व खटले मागे घेण्यासाठीच्या हलचाली सुरु झाल्या आहेत. योगी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

ताज्या बातम्या

करिश्माचा मोठा खुलासा म्हणाली, करिनापेक्षा सलमान माझ्याशी जास्त….

बॉलीवूडच्या पार्टीमध्ये जाताना स्वत:ची खास दारु सोबत घेऊन जायचे शो मॅन राज कपूर

अरे बाप रे! काळा चष्मा लावणं नवरदेवाला पडलं महागात; नवरीने मंडपातच मोडलं लग्न

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.