चहा विकून घर चालवते योगी आदित्यनाथ यांची बहीण, पुढची कहाणी वाचून डोळ्यात पाणी येईल

योगी आदित्यनाथ हे सगळ्यांनाच माहीत आहेत पण त्यांना एक बहीण आहे हे तुम्हाला माहीत आहे का? आज आम्ही तुम्हाला त्यांच्या बहिणीबद्दल सांगणार आहोत. योगी आदित्यनाथ यांची ही बहीण त्यांना भेटण्यासाठी खूप आतुर झाली आहे.

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची बहीण चहा विकून घर चालवते. पुढची कहाणी वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. पौडीच्या कोठार गावातील रहिवासी आहे शशी देवी म्हणजे योगी आदित्यनाथ यांची बहीण.

लग्नानंतर त्या एकदम साधे जीवन जगत आहेत. आणि हे खरे आहे योगी आदित्यनाथ यांची बहीण शशी देवी या तीर्थ नगरी ऋषिकेशमध्ये चहा विकून घर चालवतात. त्यांची तीर्थ नागरी ऋषिकेशमध्ये २ चहाची दुकाने आहेत.

एक दुकान नीलकंठ मंदिराजवळ आहे आणि एक दुकान भुवणेशवरी मंदिराजवळ आहे. या दुकानात चहा, भजी आणि प्रसाद मिळतो. त्यांचे म्हणणे आहे की त्यांना त्यांच्या भावाकडून उत्तराखंडचा विकास होताना बघायचे आहे.

त्यांचे म्हणणे आहे की त्यांच्या भावाने त्यांच्यासाठी काहीही नाही केले तरी चालेल पण डोंगरावर राहणाऱ्या जनतेसाठी त्याने काहीतरी केले पाहिजे. शशी देवी यांचे सासर ऋषिकेशमध्ये आहे. त्यांचे पती पुरण सिंह हे माजी सरपंच राहून गेले आहेत.

त्याचबरोबर नीलकंठ मंदिराजवळ त्यांचा एक लॉजसुद्धा आहे. शशी देवी पुढे म्हणाल्या की त्यांचे त्यांच्या भावावर खूप प्रेम आहे पण दोघांची कधी भेटच होत नाही. जेव्हा त्यांना समजले की त्यांचा भाऊ योगी म्हणजे साधू बनला आहे तेव्हा त्या प्रत्येक साधुमध्ये आपल्या भावाला बघायच्या असे त्यांनी स्वतः सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या
संभाजी ब्रिगेड सचिनविरोधात आक्रमक; भारतरत्न काढून घेण्याची केली मागणी
सुरेश पाटील- सोशल मिडीपासून लांब पण ऑन फिल्डवर नेहमीच कर्तव्यदक्ष असणारा अधिकारी
वाह, क्या बात! काकांचा चमत्कार पाहून डोळे उघडेच राहतील, भन्नाट जादूचा व्हिडीओ व्हायरल
बॉलिवूड विरुद्ध हॉलिवूड! या मुर्खांना कोणी काम दिलं? अमेरिकन अभिनेत्रीचा सवाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.