Share

‘मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यापूर्वी एकदा आईची भेट घेऊन ये’, योगींच्या बहिणीची भावुक विनंती

yogi-sister

उद्या उत्तर प्रदेशमध्ये(Uttar Pradesh) योगी आदित्यनाथ यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यासाठी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांना देखील निमंत्रण पाठवण्यात आले आहे. यादरम्यान योगी आदित्यनाथ यांच्या लहान बहिणीने त्यांना एक विनंती केली आहे.(yogi aditynath sister humble request)

“मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यापूर्वी एकदा आईची भेट घेऊन ये”, अशी विनंती योगी आदित्यनाथ यांची लहान बहीण शशी सिंह यांनी केली आहे. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी ही विनंती केली आहे. या मुलाखतीच्या वेळी शशी सिंह भावुक झाल्या होत्या. शशी सिंह यांचे उत्तराखंडमध्ये एक दुकान आहे.

या दुकानातुन मिळणाऱ्या पैशांवर त्या कुटूंबाच्या गरजा भागवत आहेत. ‘तुमचा भाऊ मुख्यमंत्री आहे आणि तुम्ही हे छोटेसे दुकान चालवता?’, असा प्रश्न शशी सिंह यांना मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना शशी सिंह म्हणाल्या की, “दुसऱ्या पक्षात घराणेशाही आहे. आमच्याकडे घराणेशाही नाही. माझा भाऊ म्हणतो , मेहनत करा, कमाई करा आणि जीवन जगा.”

“योगी आदित्यनाथ नोकरी करण्यासाठी घराबाहेर पडले होते. पण काही दिवसांनी आम्हाला समजले की, ते संन्यासी झाले आहेत. आज देखील मला कुठे साधू-संत दिसले तर मी त्यांच्यात माझ्या भावाला शोधत असते”, असे शशी सिंह यांनी सांगितले. या मुलाखतीत शशी सिंह यांना योगी आदित्यनाथ उत्तराखंडचे मुख्यमंत्री असते तर काय झाले असते? असा प्रश्न विचारण्यात आला.

त्यावर उत्तर देताना शशी सिंह म्हणाल्या की, “योगी आदित्यनाथ उत्तराखंडचे मुख्यमंत्री असते तर राज्याचा भरपूर विकास झाला असता.” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या आईची भेट घेतली होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आईसोबत भोजन देखील केले होते. आता योगी आदित्यनाथ त्यांच्या लहान बहिणीची विनंती पूर्ण करणार का? हे पाहणे औस्त्युक्याचे ठरणार आहे.

योगी आदित्यनाथ यांचा जन्म ५ जून १९७२ रोजी उत्तराखंडमधील गढवाल जिल्ह्यातील पंचुर या गावात झाला होता. योगी आदित्यनाथ यांनी नोकरी करण्यासाठी त्यांचे राहते घर सोडले होते. पण काही दिवसांनी त्यांनी नोकरी करण्याचा विचार सोडून देत राममंदिर आंदोलनात सहभाग घेतला. त्यानंतर योगी आदित्यनाथ गोरखपूर मठाचे मठाधिपती झाले.

महत्वाच्या बातम्या :-
रोज रात्री गर्लफ्रेंडच्या बाथरूममधून यायचा दुर्गंध; फरशी तोडताच समोर आलं थरकाप उडवणारं सत्य
उद्धव ठाकरे राजीनामा देणार का? की शिवसैनिकांना वेगळा आणि ठाकरेंना वेगळा नियम आहे?
..नाहीतर आम्ही मातोश्रीवर मोर्चा काढू, शिवसेनेवर बहिष्कार टाकू, ब्राम्हण समाज संतापला

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now