Share

योगी आदित्यनाथ आणि महाराष्ट्राचं ‘नाथ संप्रदाय’ कनेक्शन तुम्हाला माहिती आहे का?

Yogi-Adityanath

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ चर्चेत आले आहेत. योगी आदित्यनाथ हे संन्यासी आहेत. पण योगी आदित्यनाथ ज्या संप्रदायाचे अनुयायो आहेत, त्याचा संबंध महाराष्ट्राशी आहे.(yogi aditynath and mahrashtra connection )

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे नाथ संप्रदायाचे अनुयायी आहेत. नाथ संप्रदायामध्ये गोरक्षनाथ हे महत्वाचे सिद्ध सत्पुरुष आहेत. योगी आदित्यनाथ हे गोरखपीठाचे पीठाधीश्वर सुद्धा आहेत. गोरखपीठ नाथ संप्रदायाचे भारतातील प्रमुख केंद्र आहे. महाराष्ट्रात देखील नाथ संप्रदायाचे मोठ्या प्रमाणावर अनुयायी आहेत.

महाराष्ट्रातील नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदायामध्ये जवळचं नातं आहे. महाराष्ट्रातील लेखक रा. चिं. ढेरे यांनी ‘नाथ संप्रदायाचा इतिहास’ हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकामध्ये त्यांनी म्हंटले आहे की, “नाथ संप्रदाय हा संपूर्ण विशाल भारतावर प्रभाव गाजवणारा संप्रदाय आहे. या संप्रदायाने देश, काल, धर्म, वंश आणि भाषा यांच्या सीमा ओलांडून लोकाभिमुख दृष्टीने जनमाणसाचं प्रबोधन केलं.”

नाथ संप्रदायामध्ये गोरक्षनाथांचं महत्व फार मोठं मानलं जातं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गोरक्षनाथांचे अनुयायी असल्याचे सांगतात. गोरक्षनाथ हे मच्छिंद्रनाथांचे शिष्य होते. बाराव्या शतकातला किंवा त्याच्या आसपासचा काळ हा गोरक्षनाथांचा मानला जातो. भारतीय साधनेच्या इतिहासात युगकार म्हणून गोरक्षनाथांना मान दिला जातो.

गोरक्षनाथांचे शिष्य हे गहिनीनाथ होते. याच गहिनीनाथांनी महाराष्ट्रात नाथ संप्रदाय आणण्याचं कार्य केल्याचं दिसून येत. महाराष्ट्रातील नाथ परंपरेचा मूळ पुरुष म्हणून अनेक संशोधकांनी गहिनीनाथांचा उल्लेख केला आहे. गहिनीनाथांनी माऊली अर्थात संत ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू निवृत्तीनाथ यांना दीक्षा दिली होती. त्र्यंबकेश्वर जवळच्या ब्रम्हगिरी पर्वताच्या परिसरात गहिनीनाथांनी निवृत्तीनाथ यांना शिष्य बनवून घेतल्याचं सांगितलं जातं.

वारकरी संप्रदायातील संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर, संत सावता माळी, संत नरहरी, संत गोरोबा, संत चोखामेळा इत्यादी संतमंडळीं निवृत्तीनाथांना गुरुपदाचा मान देताना दिसतात. नाथ संप्रदाय हा योग मार्गी म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. नाथ संप्रदायचे अनुयायी असलेले योगी आदित्यनाथ वयाच्या २६ व्या वर्षी गोरखपूरमधून खासदार म्हणून निवडून आले होते.

महत्वाच्या बातम्या :-
अमेरिकेने केली रशियाची चहूबाजूंनी कोंडी; आता घेतला ‘हा’ नाक दाबणारा निर्णय
मासे खाणाऱ्यांनो ही बातमी तुमच्यासाठी! माशांमध्ये सापडले प्लास्टिक; काळजी घ्या नाहीतर होतील ‘हे’ आजार
केजरीवालांनी पंजाबमध्ये दाखवली ‘आम आदमी’ची पॉवर; मोबाईलच्या दुकानात काम करणाऱ्या मुलाला बनवलं आमदार

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now