योगीजी! …मग फिल्म इंडस्ट्री नेण्याचा विचार करा; राष्ट्रवादी काँग्रेसचा टोला

मुंबई | उत्तर प्रदेशात फिल्म सिटी उभारण्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ मुंबईत आहेत. आम्ही वर्ल्ड क्लास फिल्म सिटी बनवत आहोत, मुंबईतून घेऊन जात नाहीत. यासाठी काही निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांशी बोलणी झाली आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले.

योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौर्‍यावरुन जोरदार राजकारण सुरू आहे. योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्याला शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस विरोध करत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी योगी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

याबाबत बोलताना तपासे म्हणतात, ‘योगीजी, तुम्ही एक गोष्ट विसरलात की उद्योग व व्यापाराकरिता भयमुक्त वातावरणाची आवश्यकता असते. दिवसाढवळ्या तुमच्या राज्यात बलात्कार, लूटमार, अपहरण होतं. या घटना तुमच्या राज्यातील लोकांना आता रोजच्याच झाल्या आहेत. मात्र उत्तरप्रदेशमध्ये येणाऱ्या नव्या व्यापाऱ्यांचे संरक्षण तुम्ही कसे करणार?’, असा सवाल तपासे यांनी विचारला.

याचबरोबर ‘योगीजी पहिल्यांदा उत्तरप्रदेश भयमुक्त करा आणि मग फिल्म इंडस्ट्री नेण्याचा विचार करा, असा टोला देखील महेश तपासे यांनी हाणला आहे. ‘मुंबईतील फिल्मसिटी ही मुंबईत काम करेल, उत्तर प्रदेशमध्ये नव्याने फिल्मसिटीची उभारणी करण्यात येत आहे. फक्त एका क्षेत्रासाठी नसून संपूर्ण जगात एक मॉडेल निर्माण होईल यासाठी आमचा प्रयत्न असेल असे योगींनी स्पष्ट केले आहे.

मुंबईतून ‘फिल्म सिटी’ काढणे सोपे नाही….
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या विषयावर बोलताना म्हटले की, मुंबईतील फिल्म सिटीला इतरत्र स्थापित करणे सोपे नाही. मात्र तरीही तसं करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. असे प्रयत्न यापूर्वीही झाले आहेत. मुंबईतील फिल्म सिटीप्रमाणे काहीही कुठेही स्थापित करणे सोपे नाही. मुंबईचा चित्रपटसृष्टीचा इतिहास मोठा आहे.

पुढे संजय राऊत म्हणाले की, दक्षिण आणि बंगालमध्येही चित्रपटसृष्टी आहेत. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत, नागार्जुन, चिरंजीवी यांनी हिंदी चित्रपटांतही भूमिका केल्या आहेत. मात्र योगीजी केवळ मुंबईला लक्ष्य करणार की त्या राज्यांकडेही जाणार आहेत? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

महत्त्वाच्या बातम्या
‘आम्ही मुंबईतील फिल्मसिटी उत्तर प्रदेशला नेणार नसून नव्याने उभारणार आहोत’
‘ते’ विधान भोवलं! कंगनाला कायदेशीर नोटीस; ‘त्या वृद्ध महिलेची माफी न मागितल्यास…’
‘झूठ की, लूट की, सूट-बूट की सरकार; मित्रांचं उत्पन्न झालं चौपट, शेतकऱ्यांचं मात्र अर्ध’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.