योगीजी तुमच्या राजकीय हितासाठी लोकांच्या आयुष्याशी खेळणं सोडून द्या; हायकोर्टाने सुनावले की…

 

जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०२० पर्यंत एनएसए अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यासंदर्भातील याचिकांवर अलाहाबाद उच्च न्यायालयाने सुनावणी दिली आहे. यावेळी  योगी  सरकारला दणका देत १२० पैकी ९४ प्रकरणे रद्द करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहे.

१२० पैकी ९४ प्रकरणे ही राष्ट्रीय सुरक्षा अंतर्गत कायद्याअंतर्गत येत नाही, असे म्हणत न्यायालयाने ही प्रकरणे रद्द केली आहे. या ९४ प्रकरणासंदर्भात ३२ जिल्हाधिकाऱ्यांना न्यायालयाने आदेश दिले असून एनएसए दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करून अटक करणाऱ्यांची सुटका करण्यास सांगितले आहे.

आता याच मुद्द्यावरून काँग्रेसने योगी सरकारवर निशाणा साधला आहे. न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारच्या द्वेष आणि हुकूमशाही राजकारणाला दिलेला हा दणका आहे, अशी  टीका काँग्रेसने आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट करून केली आहे.

तसेच योगी आदित्यनाथ यांचा एक निराश झालेला फोटो ट्विट करत, तुमच्या खोट्या राजकीय हितासाठी लोकांच्या आयुष्याशी खेळणं सोडून द्या, असा सल्ला काँग्रेसने योगी आदित्यनाथ यांना दिला आहे.

दरम्यान, न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करत असताना अनेक प्रकरणांमध्ये पोलिसांनी काहीही विचार न करता एनएसए लावल्याचे निरीक्षण न्यायालायने नोंदवले आहे. अनेक प्रकरणांमध्ये तर एफआयआर जसेच्या तसे कॉपी केले गेले आहेत.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.