MNS : दसरा मेळाव्याला थोडाच कालावधी शिल्लक असताना मनसेने आता उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी ठाकरेंवर टीका केली आहे. तसेच या पत्रात उद्धव ठाकरेंना काही प्रश्न विचारून त्याची उत्तरे मागितली आहेत.
मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे यांनी हे पत्र लिहिले आहे. यात त्यांनी लिहिले की, उद्धवजी…. उद्या शिवतीर्थावर “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो” म्हणण्याआधी या प्रश्नांची उत्तरे द्या….! असे म्हणत त्यांनी खाली काही प्रश्न विचारले आहेत.
उद्धवजी…. तुम्हाला 'हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो' हे म्हणण्याचा आणि मा.बाळासाहेबांचा वैचारिक वारसा सांगण्याचा अधिकारच उरला नाही !@abpmajhatv @TV9Marathi @zee24taasnews @ibnlokmattv1 @SakalMediaNews @LoksattaLive @lokmat @mataonline @saamTVnews pic.twitter.com/mZOPvgxAgV
— Yogesh Khaire योगेश खैरे (@YogeshKhaire79) October 4, 2022
या पत्रात योगेश खैरे यांनी उद्धव ठाकरेंना आठ प्रश्न विचारले आहेत. यात मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस राष्ट्रवादी या मा. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विरोधी विचार असणाऱ्या पक्षांशी युती का केली? PFI सारखी संघटना पाकिस्तान जिंदाबाद घोषणा देत असताना आपण काहीही न बोलता शांत का बसलात?
एमआयएम सपा सारख्या पक्षांसोबत दोन – चार मतांसाठी हातमिळवणी का केली? सत्तेत असतानाही औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण का रोखलं नाही? मस्जिदीवरील भोंगे उतरले पाहिजे हा मा. बाळासाहेबांचा विचार असताना त्यासाठी केलेल्या आंदोलनात महाराष्ट्र सैनिकांवर गुन्हे का दाखल केले?
मा. बाळासाहेबांचा जनाब असा उल्लेख करून त्यांच्या हिंदुत्ववादी प्रतिमेला डाग का लावलात? अजान स्पर्धा आयोजित करून कुठल्या हिंदुत्वाची उभारणी केलीत? आपलं सरकार जाणार हे दिसल्यावरच औरंगाबादचं नाव संभाजीनगर करावं कसं सुचलं? इत्यादी प्रश्न विचारण्यात आले आहेत.
तसेच पुढे त्यांनी लिहले की, साहजिकच या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे नसणार…. त्यामुळे माझ्या जमलेल्या तमाम ‘हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो’ हे म्हणण्याचा आणि मा. बाळासाहेबांचा वैचारिक वारसा सांगण्याचा तुम्हाला अधिकारच उरला नाही !, असे योगेश खैरे या पत्रात म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
udhav thackeray : दसरा मेळावा उद्धव ठाकरेंचा चर्चा मात्र आनंद शिंदेंची; वाचा काय आहे उद्धव ठाकरेंचा प्लॅन?
Sushma Andhare : आमचा दसरा मेळावा गद्दारीविरुद्ध खुद्दारी दाखवणाऱ्या शिवसैनिकांचा असेल; सुषमा अंधारेंचा शिंदे गटाला टोला
raj thackeray : दसरा मेळावा शिवाजीपार्कवर घेण्याच्या भानगडीत पडू नका; राज ठाकरेंनी आधीच दिला होता मुख्यमंत्र्यांना मोलाचा सल्ला
Uddhav Thackeray : दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, परवानगी न मिळाल्यास बाळासाहेबांची ‘ही’ आयडीया वापरणार उद्धव ठाकरे