योगा दिनानिमित्त मलायकाचा “हा’ व्हिडिओ होतोय व्हायरल, फिटनेससाठी जिममध्ये गाळतेय घाम..

मुंबई । अभिनेत्री मलायका अरोरा नेहेमी चर्चेत असते. अभिनेता अर्जुन कपूरसोबत तिचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे देखील सांगितले जाते. तसेच मलायला आपल्या फिटनेसमुळे चर्चेत असते. पण तिच्या या सुदंर टोन्ड बॉडीचे रहस्य म्हणजे तिची अथक मेहनत आहे.

मलायका आपल्या फिट बॉडीसाठी रोज घाम गाळते. ती दररोज वर्कआउट करते. त्याचबरोबर ती आपल्या डाएटची देखील खूप काळजी घेते. मलायका स्वत:ला फिट राखण्यासाठी व्यायामासोबतच योगा देखील करते. याबाबत तिने एक व्हिडिओ शेअर केलाय. यामुळे ती किती मेहनत करत आहे हे दिसून येत आहे.

सोशल मीडियावर आपले योगा करतानाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ तिने शेअर केले आहेत. तिचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. मलायकाच्या या टोन्ड बॉडीच्या रहस्यामागे तिचा एक खास फिटनेस मंत्र आहे. मलायकाचे फिटनेस मंत्र कोणीही अगदी सहज आपल्या डेली रूटीनमध्ये समावेश करू शकते. यामुळे आपले शरीर निरोगी राहील.

https://www.instagram.com/reel/CQNVGRlBnGN/?utm_medium=copy_link

ती ब्रेकफास्टमध्ये उपमा आणि पोहा यांसारखे साउथ इंडियन पदार्थ खाते. तसेच ती ताज्या भाजीचा रस किंवा ब्राउन ब्रेड टोस्ट खाते. मलायकाला लंचमध्ये भाज्या, कोशिंबीर,  मासे किंवा चिकन यांच्यासह भात खायला आवडतो. ती रात्रीचे जेवण कमी करते. रात्रीच्या जेवणात वाफवलेल्या भाज्या आणि सलाड यांच्यासह तूप खाते.

ती दररोज न विसरता वर्कआउट करते. मलायकाच्या व्यायामामध्ये कार्डिओ, योगा यांचा समावेश असतो. मलायकाच्या फिगरचे आज लाखो चाहते आहेत. एका मुलाखतीत मलायका म्हणाली होती की, आपले शरीर एक मंदिर आहे, आपण त्याची योग्य काळजी घेतली पाहिजे आणि दररोज आपल्या फिटनेससाठी थोडा वेळ काढला पाहिजे.

मलायका ही एक बॉलीवूडमधील टॉपची अभिनेत्री आहे. तिच्या डान्सचे देखील अनेक चाहते आहेत. अभिनेता अर्जुन कपूरसोबत ती लग्न करणार असल्याची देखील चर्चा आहे.

ताज्या बातम्या

दिग्गज क्रिकेटपटूने मैदान सोडल्यावर धरली बॉलिवूडची वाट, ‘या’ चित्रपटात करणार लीड रोल

आळशी स्वभावामूळे वडील सलीम खानचे ‘हे’ स्वप्न पुर्ण करु शकला नाही सलमान खान

पुण्यातला तरुण शेवग्याच्या पानांपासून चिक्की, चॉकलेट, विकून कमवतोय लाखो रुपये, जाणून घ्या..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.