पुण्यातील हा चहावाला महिन्याला कमावतोय १२ लाख रूपये, वाचा येवलेंचा चहा कसा झाला फेमस

तुम्ही जर चहाप्रेमी असाल तर तुम्हाला येवले अमृततुल्य चहा माहित असेलच. पुण्यातील चहाचा सगळ्यात मोठा ब्रॅड म्हणजे येवले अमृततुल्य. कुठलाही बिझनेस लहान मोठा नसतो.

जर तो उद्योग योग्य प्रकारे चालवला तर तो मोठा व्हायला वेळ लागत नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे येवले अमृततुल्य चहा. पुण्यातील येवले चहावाले महिन्याला १२ लाख रूपये कमावतात. कारण त्यांचा चहा नावाप्रमाणेच अमृततुल्य आहे.

त्यांच्या चहाच्या टपरीवर नेहमी चहाप्रेमींची गर्दी असते. नवनाथ येवले व त्यांच्या सहकाऱ्यांनी २०१५ साली चहाची टपरी सुरू केली होती. त्यांचा चहा इतका प्रसिद्ध झाला की दोन वर्षात त्यांनी चहाची तीन दुकाने सुरू केली.

त्यांच्या या तीन दुकानांवर १२ लोक काम करतात. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल त्यांच्या या चहाच्या दुकानांवर दिवसाचे चार ते पाच हजार कप चहा विकला जातो. यातून त्यांना तब्बल १० ते १२ लाखांचा फायदा होतो.

तुम्ही जर नीट निरीक्षण केले तर पुण्यात असे एकही हॉटेल नाही जे चहासाठी प्रसिद्ध आहे. त्याव्यतिरीक्त पुण्यात जोशी वडेवाले आहे, रोहित वडेवाले असे प्रसिद्ध वडेवाले आहेत. त्यामुळे येवले यांना २०११ साली चहाचे दुकान टाकण्याची कल्पना सुचली.

त्यासाठी त्यांनी चार वर्षे चहावर अभ्यास केला. अभ्यास केल्यानंतर त्यांनी येवले अमृततुल्य चहाचे दुकान सुरू केले. त्यांचे म्हणणे आहे की, जसे देशातील काही भज्यांची, मिसळची, वडापावची दुकाने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाली आहेत.

त्यांनाही तशाच प्रकारे येवले चहाला देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यायचे आहे, असे नवनाथ येवले यांनी एका वृत्तवाहिनीला बोलताना सांगितले. सध्या त्यांचा येवले अमृततुल्य चहा पुर्ण महाराष्ट्रात फेमस आहे. येवले यांच्या चहाचा स्वादच वेगळा आहे त्यामुळे चहाप्रेमी आपोआप त्यांच्या चहाच्या टपरीवर ओढले जातात.

त्यांचा ही आयडिया पाहून अनेक जणांनी चहाची दुकाने सुरू केली पण त्यांना येवलेसारखे यश आले नाही. तसे पाहायचे झाले तर जायका चायसुद्धा पुण्यात चहाच्या बाबतीत खुप प्रसिद्ध आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या तुमची गोष्ट या फेसबूकला भेट द्या.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.