होय आम्ही शिवसैनिकच आहोत आणि मरेपर्यंत शिवसैनिकच राहणार; राणेंची स्पष्ट कबुली

मुंबई। सध्या राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी व विरोधक कोणत्या ना कोणत्या विषयावरून एकमेकांवर निशाणा साधत आहेत. अशातच शनिवारी (३१ जुलै) शिवसेना नेते संजय राऊत यांनी “संसदेत अनेक खासदार येतात. बऱ्याच खासदारांना कुणी ओळखतही नाहीत. पण शिवसेनेच्या खासदारांना ओळखलं जातं.

शिवसैनिक म्हणून ही ओळख आहे. पक्ष सोडून गेला तरी त्याची ओळख शिवसैनिक हीच राहते. हा नारायण राणे… तो आमका असं म्हणत नाही. तो शिवसैनिक आहे, असंच म्हटलं जातं. तुम्ही कुठंही जा, लोक तुम्हाला शिवसैनिक म्हणूनच ओळखणार.

असा चिमटा राऊतांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काढला होता. याच टीकेला आता भाजप आमदार आणि नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे. ‘होय आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत. मरेपर्यंत आम्ही शिवसैनिकच राहणार आहोत पण तुमचं काय? तुम्ही खरे शिवसैनिक आहात का?’, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले की, ‘राणे शिवसैनिक आहेत’ या संजय राऊत यांच्या मताशी मी सहमत आहे. त्याचा आम्हाला अभिमानही आहे पण संजय राऊतांचं काय? ते शिवसैनिक आहेत की शरद पवारांचे सैनिक आहेत हे त्यांनीच सांगावं असं नितेश राणे यांनी टोला लगावला आहे.

आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत अशी ओळख जाहीरपणे सांगतोय पण ते तसं सांगू शकणार नाहीत. कारण ते शिवसेनेचं नाही तर पवारांच्या राष्ट्रवादीचं काम करत आहेत’, अशा शब्दांत नितेश राणे यांनी निशाणा साधला.

राऊतांसोबत त्यांनी संपूर्ण पक्षावर टीका केली आहे. बाळासाहेबांचं शिवसेना भवन आता राहिलं नाही. शिवसेना भवन आता वसुली भवन झालं आहे, असं नारायण राणे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
संकट काही संपेना! महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांना कठोर निर्बंध लागू करण्याचे केंद्र सरकारकडून आवाहन
Bigg Boss च्या जुन्या स्पर्धकाला शो मध्ये ‘न्यूड योगा’ची ऑफर; मात्र स्पर्धकानं केली ‘इतक्या’ लाखांची मागणी
मराठी शाळेतल्या शिक्षिकेने विद्यार्थ्यांसोबत केला भन्नाट डान्स, पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल…
तुम्ही जीएसटी भरूच नका, मग ठाकरेच काय नरेंद्र मोदीही तुमच्या दारावर येतील; मोदींच्या भावाचे व्यापाऱ्यांना आवाहन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.