(Karan Mehra): ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या टीव्ही शोमध्ये ‘नौतिक’ची व्यक्तिरेखा साकारून घराघरात प्रसिद्ध झालेला करण मेहरा मागील काही दिवसांपासून पत्नी निशा रावल आणि त्याच्या विवाहितेतील वादांमुळे चर्चेत आला होता. आता पुन्हा एकदा करण मेहराने पत्नीपासून वेगळे झाल्यानंतर गंभीर आरोप केले आहेत.
यावेळी करण मेहराने पत्नीच्या अवैध संबंधांबद्दल आश्चर्यकारक गोष्टी सांगितल्या आहेत. नुकतेच करणने रडत रडत सांगितले होते की, निशा त्याला त्याच्या मुलाला भेटू देत नाही आणि त्याच्याच घरात एका दुसऱ्या पुरुषासोबत राहत आहे. आता करणने या पुरुषाचे नाव उघड केले आहे, जे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.
करण मेहराने मुंबईत पत्रकार परिषद घेऊन निशाबाबत धक्कादायक खुलासा केला. करणने सांगितले की, त्याची पत्नी निशा हिचा राखी भाऊ रोहित साथियासोबत विवाहबाह्य संबंध आहेत. करणने सांगितले की, निशा आधी रोहित साथियाला तिचा भाऊ मानत होती, त्याला राखी बांधली होती, पण आता निशा त्याच्यासोबत अवैध संबंध आहेत.
एवढेच नाही तर निशा आणि रोहित त्यांच्याच घरात राहतात. करणने असेही सांगितले की, रोहितसोबत निशाचे नाते आहे, त्यानेच निशाच्या लग्नात भाऊ म्हणून कन्यादान केले होते. अभिनेता म्हणाला, “मला हे सर्व गेल्या वर्षी कळले, पण त्यावेळी मी काही बोललो असतो तर लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला नसता. पुरावे गोळा करायला मला १४ वर्षे लागली. इतकी वर्षे मी लोकांशी बोललो, एक एक पुरावा गोळा केला. काही गोष्टी माझ्या मुलाच्या समोर झाल्या.”
करणने आठवण करून दिली की निशाने कंगना राणौतच्या लॉक अप या रिअॅलिटी शोमध्ये लग्नानंतरही तिचे अफेअर असल्याचे कबूल केले होते. करण म्हणाला, “मी म्हणालो असतो तर लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवण्याऐवजी मला आरोपी मानले असते. मी आता पुराव्यासह सांगतो की निशा रोहनसोबत राहते आणि या नात्याचे वर्णन भाऊ-बहिणीचे नाते असे करते. करणने आरोप केला की, अज्ञात नंबरवरून मला जीवे मारण्याच्या धमक्याहि येत आहे.”
गेल्या वर्षी करण मेहरा आणि निशा रावल यांचे वैयक्तिक आयुष्य चर्चेत आले होते जेव्हा दोघांनी एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केले होते. निशाने करणवर मारहाणीचे सर्व आरोप लावले होते, तसेच अभिनेत्रीने तिच्या चेहऱ्यावर आणि तिच्या डोक्यावरून रक्त वाहत असतानाची अनेक चित्रे दाखवली होती.
महत्वाच्या बातम्या
Riteish Deshmukh: रितेश देशमुखचा ‘तो’ चित्रपट ज्याने विलासराव देशमुखांची खुर्ची आली होती धोक्यात, वाचा किस्सा
Lal Singh Chaddha Review: रिलीज व्हायच्या आधीच समोर आला ‘लाल सिंग चड्ढा’चा रिव्ह्यू, वाचा आणि मगच जा पाहायला
Cap d’Agde,: नो क्लॉथ हनीमूनसाठी प्रसिद्ध आहे ‘हे’ शहर, कपडे घातले तर आकारला जातो लाखोंचा दंड