कोणताही राजकीय पक्ष हा कार्यकर्त्यांचे कष्ट आणि श्रद्धेवरच उभा राहतो. कार्यकर्ते पक्ष वाढविण्यासाठी जिवाचे रान करतात. पक्ष वाढवण्यासाठी झटणारे हेच कार्यकर्ते नेत्यांना जन्म देतात. काही कार्यकर्त्यांना आपल्या राजकीय पक्षाकडून(Political Party) निवडणुकीची उमेदवारी मिळते. पण काही कार्यकर्ते पक्ष वाढवताना रस्त्यावर येतात.(yavtamal shivsena political worker bad sitiuation)
असाच काहीसा प्रसंग यवतमाळ(Yavatmaal) जिल्ह्यातील प्रमोद जाठे यांच्याबाबतीत घडला आहे. प्रमोद जाठे हे शिवसैनिक होते. यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेचा(Shivsena) पक्ष वाढवत असताना त्यांनी विविध प्रश्नांवर आंदोलने केली. या आंदोलनामुळे त्यांना काही वेळा तुरुंगवास भोगावा लागला. पण आता या शिवसैनिकावर रस्त्यावर पूजेचे साहित्य विकण्याची वेळ आली आहे.
यामुळे काय होतास तू काय झालास तू असे म्हणण्याची वेळ आली आहे. प्रमोद जाठे यांनी शिवसेना पक्षात अनेक महत्वाची पदे भूषवली आहेत. प्रमोद जाठे यांनी केलेल्या संघर्षामुळे यवतमाळ जिल्ह्यातीळ ग्रामीण भागात शिवसेना पक्ष बळकट झाला. प्रमोद जाठे शिवसेनेचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून जिल्ह्यात खूप लोकप्रिय होते.
जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्ती त्यांना ओळखत असे. राज्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. पक्षात नवीन आलेल्या कार्यकर्त्यांना राजकीय पदे मिळाली. पण पक्षासाठी झटणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्याला कोणतेही पद मिळाले नाही. त्यामुळे हा कार्यकर्ता रस्त्यावर आला आहे.
प्रमोद जाठे आता शिवसेना पक्षात सक्रिय नाहीत. स्वपक्षाने डावलल्यानंतर सुद्धा त्यांनी दुसऱ्या पक्षात जाणे पसंत केले नाही. कधी काळी श्रीमंत असणाऱ्या आणि पक्षासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करणाऱ्या शिवसैनिकावर आज फुटपाथवर बसून हळद-कुंकू आदी पूजेचे साहित्य विकण्याची वेळ आली आहे.
पक्षासाठी खस्ता खाल्लेले असे अनेक कार्यकर्ते आज हलाखीचे जीवन जगत आहेत. शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनी त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. पक्षाने जर कार्यकर्त्यांना बळ दिले, तर शिवसेनेची राज्यात एकहाती सत्ता येईल, अशी भावना प्रमोद जाठेंनी व्यक्त केली आहे. एकेकाळी शिवसेना पक्षाचे विदर्भात प्राबल्य होतं. पण आता विदर्भात पक्षाचे ते स्थान राहिले नाही.
महत्वाच्या बातम्या :-
रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’चा टीझरने जिंकले सर्वांचे मन, या दिवशी चित्रपटगृहांमध्ये होणार प्रदर्शित
एकता कपूरच्या यशामागे आहे अशोक सराफ यांचा हात, एकताने सांगितले खरे कारण…
अरे देवा! वडिलांच्या मृत्यूनंतर तीन वर्षांच्या चिमुकलीवर आली कुटुंबाची जबाबदारी, वाचा नेमकं काय घडलं..