जेव्हा लाखोंच्या सभा गाजवणाऱ्या आचार्य अत्रेंनी मागितली होती यशवंतरांव चव्हाणांची माफी

आज महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती. संपुर्ण महाराष्ट्र घडवण्यात यशवंतरावांचे मोठे योगदान होते, त्यामुळे त्यांना महाराष्ट्राचे शिल्पकारही म्हणतात. ते एक मजबूत आणि संयमी काँग्रेस नेते होते.

यशवंतराव हे सामान्य कुटुंबातून आले होते, म्हणून त्यांची ओळख लोकनेता असेही होती. यशवंतराव चव्हाण यांनी फक्त महाराष्ट्रच घडवला नाही, तर देशाचे राजकारणातही त्यांचे मोठे योगदान होते. त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचेही निर्णय घेतले होते, चला तर मग आज जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातला एक किस्सा…

प्रसिद्ध लेखक आचार्य अत्रे संयुक्त महाराष्ट्रातील बिनीचे शिलेदार होते. तसेच ते एक पत्रकार, संपादक, एक उत्तम वक्ते होते. त्यांच्या सभांना हजारो-लाखो लोकांची गर्दी व्हायची.

त्यावेळी आचार्य अत्रेंनी चव्हाणांवर एक टीका केली होती, मात्र ही टीका व्यक्तिगत पातळीसोबतच खुप खालच्या पातळीची होती. पण यशवंतराव हे खुप संयमी नेते होते, त्यांनी अत्रेंना फोन लावला होता आणि सगळी हकीकत सांगितली तेव्हा अत्रे यांना गहिवरुन आले आणि त्यांनी जाहिरपणे यशवंतरावांची माफी मागितली होती.

जेव्हा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते, तेव्हा अनेक लोकांनी त्यांचे कौतुक केले होते, तर काही लोकांकडून यशवंतराव चव्हाणांवर टीका करण्यात आली होती. अशात आचार्य आत्रेंना चव्हाण मुख्यमंत्री झालेले आवडले नव्हते.

त्यामुळे अत्रेंनी त्यांच्या भावना थेट त्यांच्या वृत्तपत्रात मांडली होती. ‘निपुत्रिक यशवंतरावांच्या हातात महाराष्ट्राची धुरा’ असा मथळा लिहीत त्यांनी एक पुर्ण टीका करणारा अग्रलेख यशवंतराव चव्हाणांवर लिहला.

त्या अग्रलेखामुळे पुर्ण राजकारण तापले होते, तसेच महाराष्ट्रात पुर्ण खळबळ माजली होती. हा लेख यशवंतराव चव्हाणांनी वाचला पण त्यांनी अत्रेंना सगळ्यांसमोर उत्तर दिले नाही.

यशवंतराव चव्हाणांनी अत्रेंना फोन लावला आणि म्हणाले, अत्रे साहेब तुम्ही म्हणता मी निपुत्रिक.. पण मी निपुत्रिक नाही. चले जाव चळवळीवेळी मला पकडण्यासाठी पोलिसांनी माझ्या घरावर धाड टाकली होती. त्यावेळी माझ्या घरी माझी पत्नी वेणू होती.

त्यावेळी इंग्रजांच्या हाती मी लागलो नाही. तेव्हा माझी पत्नी गर्भवती होती, त्यामुळे त्यांनी पुर्ण राग वेणूवर काढला. त्यांनी पोटावर मारहाण केली, त्यामुळे तिच्या पोटाला दुखापत झाली, तेव्हाच तिच्या पोटातला गर्भ पाडला. त्यामुळे मला पुन्हा बाळ होण्यास अडचण निर्माण होत आहे.

ही सर्व हकिकत ऐकताच अत्रेंना खुप वाईट वाटले. त्यांनी लगेच यशवंतराव चव्हाणांची माफी मागितली. तसेच त्यांनी यशवंतराव चव्हाणांच्या घरी जाऊन वेणूताईंची माफी देखील माफी मागितली. इतकेच नाही तर त्यांनी जाहीरसभेत सुद्धा यशवंतराव चव्हाणांची माफी मागितली होती.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.