सध्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची आणि समीक्षकांची देखील मोठी पसंती मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर हा चित्रपट आधारित आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील चित्रपटाचे विशेष कौतुक केले आहे.(yashvant sinha conterversial statemnt on kashmir files)
यादरम्यान तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेते यशवंत सिन्हा यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या संदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. “संसदेत कायदा संमत करून हा चित्रपट न पाहणाऱ्यांना शिक्षा देण्याची तरतूद करायला हवी”, अशी उपरोधात्मक टीका यशवंत सिन्हा यांनी केली आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेते यशवंत सिन्हा यांनी याबाबतीत एक ट्विट केलं आहे.
या ट्विटमध्ये यशवंत सिन्हा यांनी लिहिले आहे की, “संसदेत कायदा संमत करून हा चित्रपट न पाहणाऱ्यांना शिक्षा देण्याची तरतूद करायला हवी. केवळ संपूर्ण भारतात हा चित्रपट टॅक्स फ्री करून चालणार नाही, तर प्रत्येक भारतीय व्यक्तीने हा चित्रपट पाहणे बंधनकारक करायला हवं”, असे तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेते यशवंत सिन्हा यांनी म्हंटले आहे.
“काश्मीर फाइल्स हा चित्रपट न पाहणाऱ्या व्यक्तीस २ वर्षाचा तुरुंगवास आणि या चित्रपटावर टीका करणाऱ्यांना जन्मठेप करण्यात यावी” असे यशवंत सिन्हा उपरोधात्मक पद्धतीने म्हणाले आहेत. यशवंत सिन्हा तृणमूल काँग्रेस पक्षात येण्यापूर्वी भाजपचे नेते होते. पण पक्षांतर्गत वादामुळे त्यांनी भाजपला रामराम ठोकला.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावर प्रतिक्रिया दिली होती. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले होते की, “सत्य जाणून घ्यायची भूक आहे, त्यांनी हा चित्रपट पाहायलाच हवा’, असे आवाहन मोहन भागवत भारतातील प्रेक्षकांना केले होते.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि अभिनेत्री पल्लवी जोशी यांची भेट देखील घेतली होती. या चित्रपटाला भाजपचे सरकार असणाऱ्या पाच राज्यांमध्ये करमुक्त करण्यात आले आहे. कर्नाटक, हरियाणा, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त घोषित करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
काश्मीर फाइल्स चित्रपट न पाहणाऱ्यास २ वर्षाचा तुरुंगवास आणि टीका करणाऱ्यांना जन्मठेप द्या’
साऊथच्या ‘या’ अभिनेत्रींनी देशभरात घातलाय धूमाकूळ; मानधनात बॉलिवूड अभिनेत्रीही त्यांच्यासमोर भरतात पाणी
पाणी वाचवा- निर्बंध लावा या सर्व गोष्टी हिंदू सणांच्या वेळीच का येतात?