एकेकाळी पाणीपुरी विकायचा हा क्रिकेटर, आयपीएलमध्ये लागली करोडो रूपयांची बोली

अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये भारताकडून खेळताना टुर्नामेंटमध्ये सर्वाधिक धावा काढणारा यशस्वी जैसवाल आज कोणाला माहित नाही. खुप कमी वेळात इतके नाव कमवणे सोपी गोष्ट नाही. त्याच्यामागे खुप मोठा संघर्ष आहे.

यशस्वी जैसवालने या संघर्षाच्या जोरावर आयपीएलमध्ये करोडो रूपये कमावले आहेत. कधी पाणीपुरी विकून दिवस काढणारा आणि एका टेंटमध्ये रात्र काढणाऱ्या यशस्वी जैसवालचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर सध्या खुप व्हायरल होत आहे.

जैसवालने आपल्या इंस्टाग्राम अकांऊटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये तो आपल्या आई वडिलांसोबत दिसत आहे आणि यशस्वी सांगत आहे की त्याच्या बहिणीचे लग्न होणार आहे. व्हिडीओमध्ये तो म्हणाला आहे की, आज दीदीचे लग्न होणार आहे आणि मम्मी व मी तिचे लग्न करून देणार आहे.

यशस्वीच्या बहिणीचे ३ जानेवारीला लग्न झाले आहे. तुमच्या माहितीसाठी उत्तर प्रदेशमध्ये राहणाऱ्या यशस्वीचे लहानपण खुप गरीबीत गेले होते. फक्त ११ वर्षांचे असताना त्यांनी क्रिकेटर बनण्याचे स्वप्न पाहिले होते आणि त्यासाठी तो मुंबईला आला होता.

तो तिथे एका डेअरी फार्ममध्ये राहत होता. पण काही दिवसानंतर त्याचे सामान फेकून देण्यात आले आणि त्याला तेथून हाकलण्यात आले. त्यानंतर आपले पोट भरण्यासाठी त्याने आझाद मैदानात रामलीला उत्सवाच्यावेळी पाणीपुरी आणि फळे विकण्याचे काम केले होते.

एक काळ असा होता की त्याला उपाशीपोटी झोपायला लागत होते. कारण ज्या ग्राउंडमॅन बरोबर तो राहायचा ते आपआपसांत खुप भांडायचे आणि जेवण बनवत नव्हते. क्रिकेटच्या मैदानावर यशस्वीने अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत.

त्याने विजय हजारे ट्रॉफीच्यावेळी २०१९ साली मुंबईकडून खेळताना द्वीशतक लगावले होते. तसेच पाच सामन्यांमध्ये त्याने ५०० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या आणि ३ शतक लगावले होते. त्याने झारखंडच्या विरोधात आपले पहिले शतक ठोकले होते.

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण असे करणारा तो जगातील पहिलाच खेळाडू आहे. एवढंच नाही विजय हजारे ट्रॉफीमध्ये एका सामन्यात त्याने सगळ्यात जास्त १२ षटकार मारण्याचा विक्रमही त्याने आपल्या नावावर केला आहे.

लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्याचे नाव आहे. आपल्या धडाकेबाज खेळीने त्याने अनेकांची मने जिंकली आहेत. येणाऱ्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना हा खेळाडू काय कामगिरी गाजवेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.