ठाकरे सरकारमधील कुरबुरी पुन्हा चव्हाट्यावर! काँग्रेसकडून आघाडीतील नेत्यांना इशारा

मुंबई | राज्यात भाजपला डावलून शिवसेना, राष्ट्रवादी – कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या तीन पक्षांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केले आहे. जवळपास एक वर्ष ठाकरे सरकारला पूर्ण झाले आहेत. मात्र महाविकास आघाडी सरकारमधील नाराजीनाट्य काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीये.

आता पुन्हा एकदा सरकारमधील कुरबुरी चव्हाट्यावर आल्या आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका झाल्याने महाआघाडीतील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्या कार्यशैलीबद्दल भूमिका मांडली होती.

त्यावरूनच काँग्रेस नाराज असल्याचे बोलले जात असतानाच महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आणि महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. पवार यांच्या नावाचा उल्लेख टाळत महाविकास आघाडीतील नेत्यांना सूचक इशारा दिला आहे.

“आघाडीमधील नेत्यांच्या काही मुलाखती/लेख माझ्या निदर्शनास आल्या आहेत. काँग्रेसची कार्याध्यक्षा म्हणून मला महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना सांगू इच्छिते की हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल तर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टीप्पणी करणे टाळावं. आघाडी धर्माचं पालन करावं”, असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.

वाचा काय म्हणाले होते शरद पवार…

एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना काँग्रेसच्या सध्याच्या परिस्थितीबाबत काय वाटतं? असं विचारलं असता अनेक मुद्द्यांवर भाष्य केले होते. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सातत्याचा अभाव दिसतो, असे शरद पवार म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या

“अजित दादा कुठेतरी अंतःकरणात लाज नावाची गोष्ट असते, बघा काही शिल्लक राहिली आहे का”
‘एकटेच लढणार अन् जिंकणार ही चंद्रकांत पाटलांची खुमखुमी चांगलीच जिरली’
‘महाविकास आघाडीची ताकद ओळखण्यास कमी पडलो’, देवेंद्र फडणवीस झाले चीतपट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.