‘आमचं काय आज आहे तर उद्या नाही’, शहीद जवानाचा अखेरचा संवाद वाचून डोळे पाणावतील

मुंबई | दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील आणखी एका जवानाला वीरमरण आले आहे. काश्मीरमधील श्रीनगर येथे दहशतवाद्यांनी भारतीय सैन्यदलाच्या तुकडीवर हल्ला केला आहे. यामध्ये पिंपळगाव येथील जवान यश दिगंबर देशमुख हे शहीद झाले आहेत. ते २१ वर्षांचे आहेत.

त्यांच्या निधनानंतर यश यांनी त्यांच्या मित्राशी केलेला संवाद समोर आला आहे. यामध्ये यश त्यांच्या मित्राला ‘आमचं काय आज आहे तर उद्या नाही’ असं मेसेजमध्ये म्हटले आहे. मित्रासोबत झालेला हा संवाद समोर आल्याने अनेकांचे डोळे पाणावले आहे.

यश यांच्या निधनाच्या बातमीनंतर गावात एकही चूल पेटली नसून दहशतवाद्याच्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला जात आहे. संपुर्ण गावात ही बातमी कळताच सर्वत्र शोककळा पसरली. यश देशमुख यांच्या पश्‍चात त्यांचे आई-वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे.

तसेच या हल्ल्यात यश यांच्यासह सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाल्याची माहिती मिळत आहे. श्रीनगरमधील एचएमटी परिसरात सुरक्षा दलाच्या टीमवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या परिसरात सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले होते. परिसरात ज्यादा कुमक तैनात करण्यात आली आहे.

श्रीनगर जवळील एचएमटी येथे गस्त घालत असलेल्या सैन्य दलाच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. काल दुपारी दोन वाजता झालेल्या दहशतवादी हल्ल्यात त्यांना वीरमरण आले. गेल्या दीड वर्षांपूर्वीच यश देशमुख यांची लष्करात रुजू झाले होते. ट्रेनिंग झाल्यानंतर त्यांना जम्मू-काश्मीरमध्ये तैनात करण्यात आले होते.

महत्त्वाच्या बातम्या
‘अर्णब पाठोपाठ कंगना प्रकरणात ठाकरे सरकारचं थोबाड फुटलं’
स्वत:ला आवरा; कोर्टाने कंगनाची केली कानउघडणी
कोरोनावरील लस घेतली तरी सुटका नाहीच, ‘हे’ साईड इफेक्ट्स दिसणार; संशोधनातून सिद्ध

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.