महाराष्ट्राने पुन्हा एक वीर जवान गमावला! २१ वर्षीय यश देशमुख काश्मीरमध्ये शहीद

मुंबई | काश्मीरमधील श्रीनगर येथे दहशतवाद्यांनी भारतीय सैन्यदलाच्या तुकडीवर हल्ला केला आहे. यात पिंपळगाव येथील जवान यश दिगंबर देशमुख हे शहीद झाले आहेत. ते २१ वर्षांचे आहेत.

श्रीनगर जवळील एचएमटी येथे गस्त घालत असलेल्या सैन्य दलाच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. काल दुपारी दोन वाजता झालेल्या दहशतवादी हल्ल्यात त्यांना वीरमरण आले.

यश यांच्या निधनाच्या बातमीनंतर गावात एकही चूल पेटली नसून दहशतवाद्याच्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला जात आहे. संपुर्ण गावात ही बातमी कळताच सर्वत्र शोककळा पसरली. यश देशमुख यांच्या पश्‍चात त्यांचे आई-वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे.

तसेच या हल्ल्यात यश यांच्यासह सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाल्याची माहिती मिळत आहे. श्रीनगरमधील एचएमटी परिसरात सुरक्षा दलाच्या टीमवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या परिसरात सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले होते. परिसरात ज्यादा कुमक तैनात करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या
तुम्ही ‘गुगल पे’द्वारे पैशांचा व्यवहार करताय? बातमी तुमच्यासाठी आहे महत्त्वाची…
रुपाली पाटलांच्या मेळाव्याला तुफान प्रतिसाद; भाजप-राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार
संजय राऊतांची बोलतीच बंद झालीय; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सोमय्यांनी सुनावले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.